जिऱ्याचं पाणी की बडीशेपचं? पचनासाठी कोणतं अधिक फायदेशीर?

Varsha Balhe

जिऱ्याचं पाणी की बडीशेपचं?

पचनाच्या समस्यांसाठी जिरे आणि बडीशेप दोन्ही उपयुक्त मानले जातात. मात्र, अपचनासाठी जिरे, तर गॅस आणि पोट फुगण्यासाठी बडीशेप अधिक योग्य पर्याय ठरू शकते.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

अपचन

जेवल्यानंतर पोट जड होणे, अन्न नीट न पचणे किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर जिऱ्याचं पाणी उपयोगी ठरू शकते. जिऱ्यातील काही घटक पचनक्रियेला चालना देण्यास मदत करतात.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

गॅस आणि पोट

पोटात गॅस होणे, पोट फुगणे किंवा अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपचं पाणी आराम देऊ शकते. बडीशेपमधील नैसर्गिक घटक पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

ॲसिडिटीसाठी

छातीत जळजळ, पोटात आम्लपित्त किंवा शरीरात उष्णता जाणवत असेल तर बडीशेपचं पाणी काही लोकांना अधिक आरामदायी वाटू शकते. मात्र, वारंवार ॲसिडिटी होत असल्यास कारण शोधणे महत्त्वाचे आहे.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

पोट

जड जेवणानंतर पोट फुगल्यासारखे किंवा जड वाटत असेल तर कोमट जिऱ्याचं पाणी घेऊ शकता. हे पचनाला मदत करणारे साधे पेय म्हणून आहारात समाविष्ट करता येते.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

दोन्ही एकत्र घेऊ शकता का?

हो, जिरे आणि बडीशेप एकत्र वापरून पाणी बनवता येते. यामुळे पचनाला मदत होण्यासोबतच गॅस किंवा पोट फुगण्यासारख्या किरकोळ त्रासात आराम मिळू शकतो. मात्र, याला कोणत्याही आजारावरील उपचार समजू नये.

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

मग शेवटी कोणतं पाणी अधिक फायदेशीर?

अपचन आणि पोट जड वाटत असेल जिऱ्याचं पाणी,मदत करेल, गॅस, ब्लोटिंग किंवा पोट फुगत असेल बडीशेपचं पाणी प्या,म्हणजेच, तुमच्या पोटाच्या समस्येनुसार योग्य पर्याय निवडा!

Cumin Water vs Fennel Water

|

esakal

भात आणि दही एकत्र खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Curd Rice Combination

|

esakal

येथे क्लिक करा