कढीपत्त्याची चटणी कधी खाल्लीय का? घरच्या घरी अशी बनवा, १५ दिवसही टिकेल

Varsha Balhe

कढीपत्त्याची चटणी

कढीपत्त्याची चटणी म्हटलं की तिची खमंग चव आणि सुगंध लगेच आठवतो. ही चटणी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

साहित्य

यासाठी कढीपत्ता, उडीद डाळ, चणा डाळ, लसूण, सुक्या लाल मिरच्या, जिरे, धने, चिंच आणि मीठ लागेल.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

सर्वात आधी काय करायचं?

कढीपत्ता स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकवून घ्या. त्यानंतर डाळी, जिरे, धने आणि लाल मिरच्या थोड्या तेलात मंद आचेवर भाजून घ्या.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

भाजून

पॅनमध्ये थोडं तेल घेऊन कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या. पानांमध्ये पाणी राहणार नाही, याची काळजी घ्या.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

चटणी

भाजलेले साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये डाळी, मसाले, लसूण, चिंच आणि मीठ घालून आधी बारीक करा. त्यानंतर कढीपत्ता घालून चटणी वाटून घ्या.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

काळजी

चटणी बनवताना पाणी अजिबात वापरू नका. चटणी पूर्णपणे कोरडी झाली की ती हवाबंद डब्यात भरून ठेवा.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

१५ दिवस चटणी टिकेल का?

चटणीमध्ये ओलावा राहिला नाही आणि ती स्वच्छ, कोरड्या हवाबंद डब्यात ठेवली, तर साधारण १५ दिवस टिकण्यास मदत होऊ शकते.

How To Roast Curry Leaves For Chutney

|

esakal

भाजीमध्ये मीठ कधी टाकावे? आधी की शेवटी? जाणून घ्या योग्य पद्धत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WHEN TO ADD SALT WHILE COOKING VEGETABLES

|

esakal

येथे क्लिक करा