डेंग्यू की व्हायरल फिव्हर? 'ही' लक्षणं कधीही दुर्लक्षित करू नका

Shubham Banubakode

डेंग्यू की साधा ताप

ताप आला की, तो डेंग्यूचा आहे की साधा व्हायरल ताप, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी काही लक्षणांवरून या दोन्ही प्रकारच्या तापांमधील फरक ओळखता येऊ शकतो.

Dengue Symptoms,

|

esakal

अचानक वाढतो ताप

डेंग्यू झाल्यास ताप अचानक १०३ ते १०४ अंश फॅरेनहाइटपर्यंत जाऊ शकतो. तर व्हायरल ताप सहसा मध्यम ते जास्त स्वरूपाचा असतो आणि अनेकदा हळूहळू वाढतो.

Dengue Symptoms,

|

esakal

स्नायू अन् सांधेदुखी

डेंग्यूमध्ये स्नायू, सांधे आणि डोळ्यांच्या मागे तीव्र वेदना जाणवू शकतात. तर व्हायरल तापात अंगदुखी असते, मात्र ती तुलनेने कमी तीव्र असते.

Dengue Symptoms,

|

esakal

त्वचेवर लाल पुरळ

डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल पुरळ दिसू शकतो. मात्र, व्हायरल तापात प्रत्येक वेळी पुरळ येतोच असे नाही. हे संबंधित विषाणूवर अवलंबून असते.

Dengue Symptoms,

|

esakal

प्लेटलेट्स

डेंग्यूमध्ये काही रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी होऊ शकतात. मात्र, व्हायरल तापात प्लेटलेट्समध्ये मोठी घट सहसा दिसून येत नाही.

Dengue Symptoms,

|

esakal

किती दिवस राहतो ताप?

डेंग्यूचा ताप साधारण दोन ते सात दिवस राहू शकतो. तर व्हायरल ताप बहुतेक वेळा तीन ते पाच दिवसांत कमी होतो.

Dengue Symptoms,

|

esakal

लक्षणं

तापासोबत तीव्र पोटदुखी, सतत उलट्या, नाक किंवा हिरड्यांतून रक्तस्राव, तीव्र अशक्तपणा किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसत असतील, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dengue Symptoms,

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला

लक्षात ठेवा, केवळ लक्षणांवरून डेंग्यू आणि व्हायरल ताप यातील फरक निश्चित करता येत नाही. योग्य निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

Dengue Symptoms,

|

esakal

सलग १० दिवस सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यास शरीरात होऊ शकतात 'हे' आश्चर्यकारक बदल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khajur Benefits

|

esakal

हेही वाचा -