कुठे आहे शंभूराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचा वाडा?

Shubham Banubakode

शंभूराजांचा जन्म

14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु, त्यांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब आजारी पडल्या आणि त्यांचे अकाली निधन झाले.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

जिजाऊसाहेबांसमोरील मोठा प्रश्न

अशावेळी नवजात शंभूराजांना आईचे दूध मिळणे अशक्य झाले, ज्यामुळे जिजाऊसाहेबांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

धाराऊ गाडे पाटील

जिजाऊसाहेबांनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावातील तुकोजी गाडे पाटील यांच्या स्नुषेला, धाराऊ यांना बोलावले.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

शंभू राजांचा सांभाळ

नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊ यांनी आपल्या पोटच्या मुलासह शंभूराजांना दूध पाजले आणि त्यांचा सांभाळ केला.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

शिवरायांनी केलं सन्मानित

धाराऊ यांच्या या ममत्वाला सन्मान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी 16 होनाची तैनाती दिली. तसेच, त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेत सामील करून घेतले, ज्यामुळे गाडे कुटुंबाला विशेष मान मिळाला.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

कापूरहोळचा वाडा

याच धाराऊ गाडे पाटील यांचे स्मारक आजही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ गावात आहे. हा वाडा स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देतो आहे.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

आजही जिवंत आहे इतिहास

कापूरहोळ गावात आजही धाराऊ यांचे वंशज राहतात. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. तसेच मराठ्यांच्या स्वाभिमानाचा इतिहास जपणारे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje | esakal

नगर जिल्ह्यातील 'या' वाड्यात आहे शिवरायांच्या चुलत आजोबांची तलवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivaji Maharaj Cousin Grandfather Sword | esakal
हेही वाचा