आजच्या 2 मिनिटांच्या नूडल्समागे आहे अन्नटंचाईची कहाणी! नेमका कसा लागला शोध?

Varsha Balhe

इन्स्टंट नूडल्स

आज भूक लागली की काही मिनिटांत तयार होणारे इन्स्टंट नूडल्स आपण आवडीने खातो. पण तुम्हाला माहित आहे का, याचा शोध फक्त चविष्ट आणि झटपट पदार्थासाठी लागला नव्हता? अन्नटंचाईच्या काळात लोकांना स्वस्त आणि पोटभरीचं अन्न मिळावं, यासाठी इन्स्टंट नूडल्सचा शोध लागला.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

अन्नटंचाई

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानची परिस्थिती अत्यंत कठीण होती. अन्नाची कमतरता होती आणि लोकांना साध्या नूडल्ससाठीही मोठ्या रांगेत उभं राहावं लागत होतं. या परिस्थितीने एका व्यक्तीला काहीतरी उपाय शोधण्याची प्रेरणा दिली.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

मोमोफुकू अँडो

जपानमधील मोमोफुकू अँडो यांनी लोकांची ही अडचण पाहिली. कमी किमतीत, चविष्ट आणि पटकन तयार होईल असं अन्न तयार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी आपल्या घरामागील छोट्या शेडमध्ये प्रयोग सुरू केले.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

प्रयोग

अँडो यांनी अनेक प्रयोग केल्यानंतर १९५८ मध्ये Chicken Ramen तयार केले. नूडल्स आधी वाफवून आणि चव देऊन त्यांना गरम तेलात झटपट तळलं जात होतं. त्यामुळे त्यातील ओलावा निघून गेला आणि नूडल्स बराच काळ टिकू लागले.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

इतिहास

२५ ऑगस्ट १९५८ रोजी चिकन रामेन बाजारात आले. गरम पाण्यात काही मिनिटं ठेवली की नूडल्स तयार होत असल्याने हा प्रकार लोकांच्या पसंतीस उतरला. अशाप्रकारे जगातील पहिल्या इन्स्टंट नूडल्सची सुरुवात झाली.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

नूडल्स

इन्स्टंट नूडल्सच्या यशानंतर मोमोफुकू अँडो यांनी आणखी एक कल्पना आणली. १९७१ मध्ये कप नूडल्स बाजारात आले. नूडल्स कपमध्येच असल्याने त्यात फक्त गरम पाणी टाकायचं आणि काही वेळात खाण्यासाठी तयार! यामुळे इन्स्टंट नूडल्स आणखी लोकप्रिय झाले.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

लोकप्रिय पदार्थ

अन्नटंचाईच्या काळात लोकांना स्वस्त आणि झटपट अन्न मिळावं, या उद्देशाने सुरू झालेला हा प्रयोग पुढे जगभर पोहोचला. आज प्रत्येक देशात इन्स्टंट नूडल्सचे वेगवेगळे स्वाद आणि प्रकार पाहायला मिळतात. भारतामध्येही इन्स्टंट नूडल्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.

INSTANT NOODLES HISTORY

|

esakal

काचेच्या बरणीत मीठ ठेवण्यामागचं गुपित काय? घराच्या ‘या’ समस्यांशी आहे संबंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SALT IN GLASS JAR BENEFITS

|

esakal 

येथे क्लिक करा