HSRP नंबर प्लेटवर कोणत्या गोष्टी असतात, तुम्हाला माहितेय का?

सकाळ वृत्तसेवा

HSRP नंबर प्लेट बसवण्याची सक्ती

1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी HSRP अनिवार्य करण्यात आले आहे. 30 जून 2025 पर्यंत नवीन नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे.

HSRP number plate | Sakal

नियम तोडल्यास दंड

मुदतीच्या आत नंबर प्लेट न बसवल्यास दंड ठोठावला जाणार आहे. मोटर वाहन कायदा 1988 नुसार ₹1000 दंड आकारला जाईल

HSRP number plate | Sakal

IND चिन्ह

HSRP प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात ‘IND’ लिहिलेलं असतं. याचा आकार वाहन क्रमांकाच्या एक चतुर्थांश असतो.

HSRP number plate | Sakal

अशोक चक्र

20 मिमी आकाराचं क्रोमियम-आधारित अशोक चक्र आहे. हे ‘हॉट स्टॅम्पिंग’द्वारे छापलेलं असतं.

HSRP number plate | Sakal

युनिक क्रमांक

प्रत्येक नंबर प्लेटला 10 अंकांचा विशेष क्रमांक दिला जातो. तो ‘रिफ्लेक्टिव्ह शीट’वर ‘लेसर ब्रँडिंग’द्वारे कोरलेला असतो.

HSRP number plate | Sakal

सुरक्षेची हमी

पाटीवरील मजकूर जास्त होऊ नये म्हणून हे अंक ‘रिफ्लेक्टिव्ह शीट’वर ‘लेसर ब्रँड’ केले आहेत. या अंकांसाठी 5 मिमी जागा आहे.

HSRP number plate | Sakal

RTO नोंदणी

वाहन खरेदीच्या वेळी RTO नोंदणी प्रणालीमध्ये माहिती सेव्ह केलेली असते. त्यात वाहन क्रमांक, मालकाचं नाव, मोबाइल नंबर, इंजिन क्रमांक, पत्ता इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात.

HSRP number plate | Sakal

HSRP का महत्त्वाची?

वाहन चोरी रोखण्यासाठी या नंबर प्लेटची गरज आहे. तसेच वाहनाचा खरा मालक कोण आहे तो ओळखण्यासाठी याची मदत होणार आहे.

HSRP number plate | Sakal

वेळेत HSRP नंबर प्लेट बसवा

30 जून 2025 पूर्वी HSRP नंबर प्लेट लावा. नवीन नियमांचे पालन करा नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

HSRP number plate | Sakal

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेले राम सुतार नेमके कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ram sutrar | esakal
येथे क्लिक करा