तापसी पन्नूला कामासाठी हात पसरावे लागतात? या दिग्दर्शकासोबत काम करण्याची आहे इच्छा

Anuradha Vipat

अभिनेत्री तापसी पन्नू

'हसीन दिलरुबा' अभिनेत्री तापसी पन्नू सध्या खूप आनंदी दिसत आहे. शाहरुख खानसोबतचा तिचा पहिला चित्रपट 'डंकी' सुपरहिट ठरला आहे.

Taapsee Pannu

मीडियाशी बोलताना...

अलीकडेच, मीडियाशी बोलताना तापसी पन्नूने तिची एक इच्छा व्यक्त केली. दिग्दर्शक नीरज पांडेसोबत पुन्हा काम करायला आवडेल, असे तिने सांगितले.

Taapsee Pannu

मला काम द्या सर...

तापसी पन्नू म्हणाली, 'मी त्यांना वारंवार भेटत राहते आणि जेव्हाही भेटते तेव्हा मी म्हणते, सर, तुम्ही दुसरे काही करता का? मी स्वत: तो चित्रपट सुरू करण्याची वाट पाहत आहे आणि मी त्या चित्रपटाचा भाग होऊ शकेन. किती वेळा सांगितलंय मला काम द्या सर.

Taapsee Pannu

केवळ सात मिनिटांची भूमिका

तापसी पुढे म्हणाली, 'कदाचित नीरज जीला वाटेल की मी मस्करी करतेय, पण मला त्यांच्यासोबत काम करायचे आहे. 'बेबी' चित्रपटात माझी केवळ सात मिनिटांची भूमिका होती.

Taapsee Pannu

तो क्षण स्वप्नपूर्तीसारखा

'बेबी' नंतर त्याने मला 'नाम शबाना'मध्ये साइन केले. मी पूर्णपणे नवीन होते आणि नीरजजींनी मला ही भूमिका ऑफर केली होती. माझ्यासाठी तो क्षण स्वप्नपूर्तीसारखा होता.

Taapsee Pannu

काम मागायला मी...

तिचे बोलणे संपवताना तापसी म्हणते, 'कोणत्याही दिग्दर्शकाकडून काम मागायला मी मागेपुढे पाहत नाही, पण नीरज पांडेसोबत माझी वेगळी केमिस्ट्री आहे.

Taapsee Pannu

आनंद आहुजाने उशिराने दिल्या सासरे अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलगी सोनमने दिली अशी प्रतिक्रिया...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anand Ahuja belated birthday wishes Anil Kapoor