पृथ्वीवरुन मानव कधी होणार नष्ट? समोर आली धक्कादायक माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

विकासाच्या आंधळ्या शर्यतीत सारे जग रोज नवनवीन शोध लावण्यात व्यस्त आहे. परंतु, यामुळे हवामानाची मोठ्या प्रमाणावर हानी करत आहोत.

हवामानाच्या नुकसानीमुळे, पृथ्वीवर राहणारे प्राणी आणि वनस्पतींसह मानवांचे आरोग्य आणि आपल्या ग्रहाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, आपण पृथ्वीच्या सुरक्षेच्या 7 मर्यादा ओलांडल्या आहेत. सध्या आपण हवामानाच्या 8 सुरक्षित मर्यादेपैकी शेवटच्या भागात आहोत.

शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर एकूण 8 नैसर्गिक संरक्षणाचे स्तर आहेत. हा थर मानवाला आणि पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जीवांना आणि वनस्पतींना केवळ संरक्षणच देत नाही तर त्यांना निरोगी ठेवतो.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेला हा अभ्यास जगभरातील ४० हून अधिक शास्त्रज्ञांच्या टीमने केला आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आता आपला ग्रह मानवांना राहण्यासाठी योग्य नाही.

संशोधकांच्या मते, मानवाने पृथ्वीला सुरक्षित ठेवणारी प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शास्त्रज्ञांनी मानवाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या सीमा काय आहेत?

नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालानुसार, निसर्गाकडून मिळालेल्या सर्व गोष्टी प्रदूषित झाल्या आहेत.

हळूहळू माणसांचे जगणे कठीण होत चालले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी आणि आपल्या सुरक्षा सीमांमध्ये हवामान, जैवविविधता, गोडे पाणी, हवा, माती आणि पाणी यांचा समावेश होतो.

या सर्वांमध्ये विषाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीचे पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे.

शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, पृथ्वीवरील जीवन सुरक्षेचे घटक धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत.

अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय चिंताजनक

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर पृथ्वी आणि येथे राहणाऱ्या प्रत्येक सजीव प्रजातीला सुरक्षा प्रदान करणारे घटक धोक्यात आले, तर आपले आणि आपल्या ग्रहाचे काय होईल याची कल्पना करणे कठीण नाही.

लेखानुसार, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हवामानाने 1-C मर्यादा ओलांडली आहे. बदलत्या हवामानामुळे लाखो लोक आधीच असुरक्षित झाले आहेत.

पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चचे प्रोफेसर जोहान रॉकस्ट्रॉम यांच्या मते, आरोग्य चाचण्यांचे निकाल अत्यंत चिंताजनक झाले आहेत.

2015 पर्यंत जागतिक तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्यास संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांनी सहमती दर्शवली आहे.

याशिवाय जगातील 30 टक्के जमीन, समुद्र आणि गोड्या पाण्याच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण करण्याचेही मान्य करण्यात आले आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्याच्या परिस्थितीत निर्धारित लक्ष्य पूर्ण करू शकत नाही. शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की पृथ्वीवरील प्रत्येक बदलाचे आयोजन करण्याची वेळ आली आहे.

संतुलन राखून आपण काही काळ धोका टाळू शकतो. न्युज १८ हिंदी या वृत्तवाहिनीने यासंबधीचे वृत्त दिले आहे.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

tea