Ben Stokes: इंग्लंडचा 'मिरॅकल मॅन'

प्रणाली कोद्रे

वाढदिवस

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सचा जन्म न्युझीलंडमधील ख्राईस्टचर्च येथे 4 जून 1991 मध्ये झाला.

Ben Stokes | Sakal

न्यूझीलंडमधून इंग्लंडमध्ये

बेन स्टोक्स लहान असतानाच त्याचे वडिल कुटुंबासह इंग्लंडला स्थायिक झाले होते. त्यामुळे स्टोक्सने क्रिकेटचे धडे इंग्लंडमध्ये गिरवले.

Ben Stokes | Sakal

इंग्लंडमध्ये स्थायिक

पुढे आई-वडील परत न्युझीलंडमध्ये आल्यानंतरही स्टोक्स इंग्लंडमध्येच कायम राहिला.

Ben Stokes | Sakal

पदार्पण

स्टोक्सने 2011 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

Ben Stokes | Sakal

मोठ्या सामन्यांचा खेळाडू

स्टोक्सने इंग्लंडसाठी अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. त्याने 2019 वनडे वर्ल्डकप आणि 2022 टी20 वर्ल्ड कप इंग्लंडला जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Ben Stokes | Sakal

ती अविस्मरणीय खेळी

त्याने ऍशेस मालिकेत हेडिंग्ले कसोटीतही दुसऱ्या डावात नाबाद 135 धावा केल्या होत्या. त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर नाबाद ७६ धावांची खेळी केली होती.

Ben Stokes | Sakal

कर्णधार

स्टोक्सने वनडेतून निवृत्ती घेतली आहे. पण असे असले तरी तो कसोटीतील नियमित खेळाडू आहे, इतकेच नाही, तर इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधारही आहे.

Ben Stokes | Sakal

कसोटी क्रिकेट

स्टोक्सने 102 कसोटी सामने खेळले असून 12 शतके आणि 31 अर्धशतकांसह 6316 धावा केल्या आहेत. तसेच 198 विकेट्स घेतल्या आहेत.

Ben Stokes | Sakal

वनडे क्रिकेट

114 वनेडत त्याने 5 शतके आणि 24 अर्धशतकांसह 3463 धावा केल्या आहेत आणि 74 विकेट्स घेतल्या आहेत.

Ben Stokes | Sakal

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 43 सामन्यांत त्याने 585 धावा केल्या आहेत आणि 26 विकेट्स घेतल्या आहेत.

Ben Stokes | Sakal

IPL नंतर धोनीची कुटुंबासह युरोप ट्रिप, फोटो व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Wife Sakshi | Instagram