अमृता खानविलकर येतेय ‘लुटेरे’ घेऊन!

Manoj Bhalerao

अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी चित्रपसृष्टीसोबतच बॉलीवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Amruta Khanvilkar | Esakal

ती नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. मग ते फॅशनच्या बाबतीत असो किंवा अभिनय क्षेत्राच्या बाबतीत.

Amruta Khanvilkar | Esakal

तिने आतापर्यंत अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज केल्या आहेत. आता ती पुन्हा एकदा एका वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

‘लुटेरे’ असं या वेबसीरिजचं नाव असून यात तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. ही सीरिज तिच्यासाठी खूपच खास असणार आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

यात तिच्यासह अनेक दिग्गज कलाकारदेखील झळकणार आहेत. डिस्नी हॉटस्टारवर ही सीरिज प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन जय मेहता यांनी केले आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

या वेबसीरिजचा ट्रेलर ६ मार्चला रिलीज करण्यात आला होता. २२ मार्चपासून या वेबसीरिजचे स्ट्रिमिंग सुरू होणार आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

अमृतासोबत रजत कपूर, विवेक गोंबर आणि आमिर अली हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही एक क्राईम थ्रिलर सीरिज आहे. ‘स्कॅम १९९२’ आणि ‘स्कूप’सारख्या सुपरहिट वेबसीरिज देणाऱ्या हंसल मेहता यांची ‘लुटेरे’ ही वेबसीरिज आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

दरम्यान, ‘लुटेरे’ वेबसीरिजसोबत अमृता खानविलकर ‘कलावती’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘ललिता बाबर’ यांसारख्या मराठी चित्रपटांत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Amruta Khanvilkar | Esakal

सईने घेतलं मुंबईत अलिशान घर, किंमत आहे कोटींमध्ये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai tamhnkar | esakal