शर्मिला टागोरशिवाय राजेश खन्नांनी कसं शूट केलं ‘मेरे सपनो की रानी’?

Manoj Bhalerao

शर्मिला टागोर आणि राजेश खन्ना यांच्या १९६९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटाला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Sharmila Tagore And Rajesh Khanna

या चित्रपटातील ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ हे गाणे सुपरहिट झाले होते. या गाण्याची जादू आजही कायम आहे.

Rajesh Khanna

या गाण्यात त्यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. ‘आराधना’मधील ‘मेरे सपनो की रानी’ या गाण्यात राजेश खन्ना जीप चालवताना दिसत आहेत. सुजित कुमारही त्यांच्यासोबत होते, तर शर्मिला टागोर ट्रेनमध्ये बसल्या होत्या.

Rajesh Khanna

शूटिंग दार्जिलिंगच्या सुंदर स्थळावर झाले आहे. या गाण्याशी संबंधित सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे शर्मिला टागोर शूटिंगदरम्यान उपस्थित नव्हत्या.

Sharmila Tagore

स्वतः शर्मिला टागोर यांनी याचा खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, राजेश खन्ना यांना ‘आराधना’मधील ‘मेरे सपनो की रानी’ हे सुपरहिट गाणे एकट्याने शूट करावे लागले. कारण त्यांच्या तारखा व माझ्या तारखा एकमेकांशी जुळत नव्हत्या.

Sharmila Tagore And Rajesh Khanna

राजेश खन्ना यांनी दार्जिलिंगमध्ये एकट्याने गाणे शूट केले, तर शर्मिला टागोरने मुंबईतील स्टुडिओमध्ये मागील प्रोजेक्शनद्वारे त्यांचा भाग शूट केला.

Sharmila Tagore And Rajesh Khanna

नंतर राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांचे सीन एडिट करून ‘मेरे सपनो की रानी’ हे गाणे तयार करण्यात आले.

Sharmila Tagore

फक्त भारतीयच नाही, तर परदेशी क्रिकेटर्सही रंगले होळीच्या रंगात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketers Holi | X