बाळकृष्ण मधाळे
भारतात पहिली कार कधी आली आणि ती कोणी चालवली? कारचा इतिहास जितका रोचक आहे, तितकीच त्याच्या सुरुवातीची कहाणीही रंजक आहे.
भारतामध्ये पहिली कार 1897 साली आली होती. ही कार एका ब्रिटिश व्यापाऱ्याची होती. विल्यम फोस्टर, जे त्या काळी क्रॉम्पटन ग्रीव्ह्स कंपनीचे प्रमुख होते. त्यांनी ही कार कोलकात्यात आणली होती आणि ती पाहून स्थानिक लोक थक्क झाले होते.
भारतामध्ये कार इंग्रजांच्या माध्यमातून आली असली तरी, पहिले भारतीय ज्यांनी कार चालवली ते होते जमशेदजी टाटा. त्यांनी 1901 मध्ये एक कार विकत घेतली आणि ती मुंबईच्या रस्त्यांवर चालवली होती. त्या काळी कार विकत घेणे हे केवळ श्रीमंतांच्याच आवाक्यात होतं.
त्या काळात भारतात आलेल्या कार आजच्या आधुनिक कारसारख्या नव्हत्या. त्या कारमध्ये ना एअर कंडिशनिंग होते, ना पॉवर स्टीअरिंग आणि ना ऑटोमॅटिक गिअरसारख्या सुविधा. इंजिन मोठ्या आवाजात चालत असे आणि त्या कार चालवणेही सहज सोपे नव्हते. तरीही, त्या काळी कार ही श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जात होती.
भारतामध्ये तयार झालेली पहिली कार होती ‘एम्बेसडर’, जी 1957 मध्ये हिंदुस्तान मोटर्स कंपनीने लॉन्च केली. अनेक दशके ही कार सरकारी अधिकारी, मंत्री आणि टॅक्सी चालकांची पहिली पसंती होती. ही कार भारतीय रस्त्यांची ओळख बनली होती.
1983 मध्ये आलेली मारुती 800 हिने भारतातील कार जगतात क्रांती घडवून आणली. ही कार सामान्य माणसाच्या आवाक्यात आली आणि प्रत्येक घराचे स्वप्न बनली. त्यामुळे कार ही केवळ श्रीमंतांची गोष्ट राहिली नाही.
आजच्या काळात भारतात प्रत्येक बजेटमध्ये कार उपलब्ध आहे. अगदी छोट्या कारपासून ते आलिशान लक्झरी मॉडेल्सपर्यंत. लोक आता केवळ वाहन खरेदी करत नाहीत, तर तंत्रज्ञानाने युक्त स्मार्ट कार (इलेक्ट्रिक वाहनं, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि AI-आधारित सुविधा) निवडताहेत. आता कार ही फक्त प्रवासाचे साधन राहिलेली नाही, तर ती एक स्मार्ट, सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैलीचे प्रतीक बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.