Varsha Balhe
वास्तुशास्त्रानुसार घरात फिश टॅंक ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख-समृद्धीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते, असा समज आहे.
Vastu Fish Aquarium Rules
esakal
फिश टॅंक ठेवण्यासाठी उत्तर, पूर्व आणि ईशान्य दिशा शुभ मानल्या जातात. या दिशांना मत्स्यालय ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक समृद्धीला चालना मिळते, अशी वास्तु मान्यता आहे.
Vastu Fish Aquarium Rules
esakal
वास्तुनुसार फिश टॅंक दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवणे टाळावे. तसेच किचन, बेडरूम आणि घराच्या मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानात अॅक्वेरियम ठेवू नये, असे सांगितले जाते.
Vastu Fish Aquarium Rules
esakal
वास्तुशास्त्रानुसार अॅक्वेरियम मध्ये ९ मासे ठेवणे शुभ मानले जाते. यामध्ये ८ सोनेरी मासे आणि १ काळा मासा ठेवण्याची पद्धत प्रचलित आहे. काळा मासा नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो, अशी मान्यता आहे.
Vastu Fish Aquarium Rules
esakal
वास्तु मान्यतेनुसार एखादा मासा नैसर्गिकरीत्या मेला, तर तो ताबडतोब Aquarium मधून बाहेर काढावा. त्याचबरोबर टॅंकमधील पाणी स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घाणेरडे किंवा दुर्गंधीयुक्त पाणी ठेवणे टाळावे.
Vastu Fish Aquarium Rules
esakal
फिश टॅंक शक्यतो गोल किंवा आयताकृती आकाराचा असावा. त्रिकोणी अॅक्वेरियम टाळण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो. योग्य दिशा, स्वच्छ पाणी आणि माशांची योग्य काळजी घेतल्यास घरातील वातावरण प्रसन्न राहू शकते.
Vastu Fish Aquarium Rules
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal