Varsha Balhe
भाजीमध्ये चुकून मीठ जास्त पडलं आणि भाजी खारट झाली? काळजी करू नका! स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या काही साध्या पदार्थांच्या मदतीने खारटपणा कमी करून चव संतुलित करता येते.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
गव्हाच्या कणकेचा छोटा गोळा बनवा आणि तो काही वेळ भाजीत ठेवा. नंतर तो बाहेर काढून टाका. हा उपाय विशेषतः रस्सा असलेल्या भाजीत करून पाहता येतो.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
सोललेला कच्चा बटाटा दोन-तीन तुकड्यांत कापून भाजीत काही वेळ शिजवा. नंतर बटाट्याचे तुकडे बाहेर काढा. यामुळे भाजीतला काही अतिरिक्त द्रव आणि मीठ कमी होण्यास मदत होऊ शकते.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
भाजीमध्ये रस्सा जास्त असेल तर थोडं पाणी घालून प्रमाण वाढवता येते. गरजेनुसार दूध किंवा दही वापरूनही चव सौम्य करता येते.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
सुकी भाजी खारट झाली असल्यास त्यात थोडं भाजलेलं बेसन किंवा शेंगदाण्याचं कूट घाला. यामुळे भाजीचं प्रमाण वाढण्यासोबत चवही संतुलित होण्यास मदत होते.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
मीठ जास्त झाल्यास थोडासा लिंबाचा रस, टोमॅटो किंवा चिमूटभर साखर/गूळ घालून चवीचा समतोल साधता येतो. मात्र, हे पदार्थ थोडे-थोडे घालून चव तपासा.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
कणकेचा गोळा कच्चा बटाटा पाणी/दही भाजलेलं बेसन लिंबू + चिमूटभर साखर
यापैकी भाजीच्या प्रकारानुसार योग्य उपाय निवडा आणि एकदम जास्त पदार्थ न घालता थोड्या प्रमाणात वापरा.
HOW TO FIX SALTY CURRY
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
HOW TO SOAK BASMATI RICE
esakal