हिवाळ्यात लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

हिवाळ्यातील वातावरणाचा त्वचेसोबतच आपल्या डोळ्यांवर ही परिणाम होतो. या थंड वाऱ्यांमुळे डोळे लाल होणे, डोळ्यांमध्ये कोरडेपणा येण्याची समस्या निर्माण होते.

Health Care

कडाक्याच्या थंडीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांतून वारंवार पाणी येते.

Health Care

स्किनकेअर आणि आयकेअर

हिवाळ्यात फक्त त्वचेची काळजी घेऊ नका, तर लहान मुलांच्या डोळ्यांची ही तितकीच काळजी घेणे महत्वाचे आहे.

Health Care

स्क्रिन टाईम

आजकाल लहान मुलांचे मोबाईल पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, यामुळे मुलांच्या डोळ्यांवर ताण येण्याची शक्यता असते. त्यामुळे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी मुलांचा स्क्रिन टाईम निश्चित करा.

Health Care

शरीर ठेवा हायड्रेटेड

थंड हवेमुळे शरीरावर परिणाम होतो आणि थंडीमुळे जास्त पाणी देखील प्यायले जात नाही. परंतु, असे करू नका हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, मुलांना पुरेसे पाणी प्यायला सांगा.

Health Care

चष्मा खरेदी करा

सूर्याची अतिनील किरणे तुमच्या मुलाच्या डोळ्यांना इजा करू शकतात. त्यामुळे, हिवाळ्यात मुलांच्या डोळ्यांचे अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनग्लासेस किंवा चष्मा खरेदी करा.

Health Care

संतुलित आहार

हिवाळ्यात तुमच्या मुलांच्या आहारात भरपूर प्रथिने, कॅल्शिअम आणि जीवनसत्वांचा समावेश करा. यामुळे, मुलांचे आरोग्य मजबूत राहण्यास मदत होईल आणि डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होईल.

Health Care

कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत 'या' डाळी, आजच करा आहारात समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care