राजकारणात उतरणारे 'हे' कलाकार आहे एवढ्या संपत्तीचे मालक

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि यंदाच्या वर्षात अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला तर काहीजण निवडणुकीला उभे राहिले आहेत. प्रेक्षकांचं मनोरंज करणाऱ्या या कलाकारांकडे किती संपत्ती आहे जाणून घेऊया.

'रामायण' या नव्वदच्या दशकात गाजलेल्या मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आणि ते लोकसभा निवडणुकीलाही उभे राहिले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार अरुण गोविल यांची संपूर्ण संपत्ती ३८ करोडहून जास्त आहे. त्यांच्याकडे एक मर्सिडीज गाडी असून तिची किंमत ६२.९९ लाख रुपये इतकी आहे.

'रामायण' मालिकेत माता सीतेच्या भूमिकेत दिसलेल्या दीपिका चिखलीया यांनीही भाजपामध्ये प्रवेश केलाय. रामायण मालिकेवेळी त्यांना वीस लाख रुपये मानधन देण्यात आलं होतं तर दीपिका यांची आता संपत्ती ३८ करोड रुपये इतकी आहे.

कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतने सुद्धा भाजपामध्ये प्रवेश केला असून ती मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवतेय. कंगनाने आजवर अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय आणि अनेक सिनेमांची निर्मिती केलीये.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगनाचं वार्षिक उत्पन्न अंदाजे ९८ करोडच्या घरात असून ती ८५ रुपयांची स्थिर संपत्ती तिच्या मालकीची आहे. याशिवाय ती फिल्मसाठी अंदाजे १५-२० करोड आणि जाहिरातीसाठी अंदाजे ३-३.५ करोड इतकं मानधन घेते.

हिरामंडी फेम अभिनेता शेखर सुमन यांनीही यंदा भाजपामध्ये प्रवेश केला. या आधी शेखर यांनी काँग्रेस पक्षातून शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती.

शेखर सुमन यांची एकूण संपत्ती २० करोड रुपये इतकी आहे शिवाय त्यांचा मुंबईत स्वतःचा बंगला आहे.

अनुपमा मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री रुपाली गांगुलीनेही यंदा भाजपात प्रवेश केला. रुपाली सध्या टेलिव्हिजनवरील सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

रुपाली एका एपिसोडमागे तीन लाख रुपये मानधन घेते. तिची एकूण संपत्ती सुमारे २५ कोटी रुपये इतकी आहे.

अभिनेत्री गुल पनाग हिने सुद्धा आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. २०१४ पासून ती राजकारणात सक्रिय आहे.

आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलेल्या गुलची एकूण संपत्ती ५ ते ६ कोटी रुपये असल्याचं म्हंटलं जातंय.

अभिनेता गोविंदाने नुकताच भाजपात प्रवेश केला असून सध्या तो निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे.

एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्याची एकूण संपत्ती १७० करोड रुपयांच्या घरात असून त्याचं वार्षिक उत्पन्न १० ते १२ करोड रुपयांच्या घरात आहे. तर तो एका सिनेमासाठी ५ ते ६ करोड रुपये इतकं मानधन स्वीकारतो.

अभिनेत्री काम्या पंजाबी हिनेही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टेलिव्हिजन स्टार असलेल्या या अभिनेत्रींच्या राजकारणातील प्रवेशाने सगळ्यांनाच धक्का बसला.

काम्याची एकूण संपत्ती १०-१२ कोटींच्या घरात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.