Orange Centers : राज्यात 8 आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास सरकारची मान्यता!

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने नागपूर, अमरावती, बुलढाणा येथे 8 आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता दिली आहे.

Orange Processing Centers

अध्यादेश काढून मान्यता

आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीसाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागानं अध्यादेश काढून मान्यता दिलीये.

Orange Processing Centers

संत्रा उत्पादकांना मोठा फायदा

सरकारच्या या निर्णयामुळं संत्रा प्रक्रिया आणि साठवणुकीच्या उद्योगाला चालना मिळणार असून संत्रा उत्पादकांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Orange Processing Centers

संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार

विदर्भातील नागपूर, काटोल आणि कळमेश्वर, जि. नागपूर व मोर्शी, जि. अमरावती व संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे हे संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

Orange Processing Centers

नागपूर, काटोल, कळमेश्वर येथेही होणार केंद्रे

याशिवाय, नागपूरमध्ये नागपूर, काटोल आणि कळमेश्वर येथे प्रत्येकी 1 संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.

Orange Processing Centers

संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार

अमरावतीत मोर्शी येथे 3 संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर, बुलढाण्यात संग्रामपूर येथे 2 संत्रा प्राथमिक प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर या तीन जिल्ह्यात 16 संत्रा दुय्यम प्रक्रिया प्रकल्प संख्या उभारले जाणार आहेत.

Orange Processing Centers

20 व्या वर्षी पहिलं लग्न, दोनदा घटस्फोट; आता तिसऱ्या प्रेमाच्या शोधात आहे 'ही' अभिनेत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.