Varsha Balhe
हरभऱ्याची भाजी चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. यात शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक मिळतात.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
आज आपण हरभऱ्याची भाजी खाल्ल्याने होणारे फायदे आणि ती घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, हे जाणून घेणार आहोत.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
हरभऱ्याच्या भाजीमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते. तसेच पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरससारखी पोषक तत्त्वे असतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून हाडे आणि रक्ताच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त ठरू शकते.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी २ कप चिरलेली हरभऱ्याची भाजी, ३-४ चमचे भिजवलेली डाळ, लसूण, हिरवी मिरची, शेंगदाण्याचा कूट, तेल, मोहरी, जिरे, हळद आणि मीठ घ्या.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
कढईत तेल गरम करून मोहरी-जिऱ्याची फोडणी द्या. त्यात लसूण आणि हिरवी मिरची परतून भिजवलेली डाळ घाला. डाळ थोडी शिजल्यानंतर त्यात चिरलेली हरभऱ्याची भाजी आणि मीठ घाला.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
भाजी झाकून मंद आचेवर साधारण ५ ते ७ मिनिटे शिजू द्या. शेवटी २-३ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून एक-दोन मिनिटे परता.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
गरमागरम हरभऱ्याची भाजी तयार! ही भाजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, तसेच चपातीसोबत छान लागते.
Health Benefits of Green Chickpea Leaves
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
VASTU TIPS PHOTO PLACEMENT DIRECTION
esakal