कमी पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या

Aishwarya Musale

हृदयाचे आरोग्य

आपले हृदयाचे आरोग्य हे आपल्या आहारावर अवलंबून असते. आपण काय खातो काय पितो यावर आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. पण आपली जीवनशैली आणि आहार योग्य नसेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. तसंच योग्य आहारासोबतच पाणी पिणे शरीरासाठी खूप गरजेचं असतं.

डॉक्टरसुद्धा प्रत्येकाला नेहमी पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी प्यायल्याने आपले शरीर नेहमी हायड्रेट आणि निरोगी राहते.

पण जर तुम्ही कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो.

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पाणी पिणे गरजेचे आहे. कारण पाणी हे आपल्या हृदयाच्या कार्याला चालना देते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर होतो. कारण पाणी हे एक डिटॉक्सिफायिंग एजंट आहे जे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते.

तसंच पाणी कमी प्यायल्याने डीहायड्रेशन होते आणि डीहायड्रेशनमुळे आपले लिव्हर रक्तामध्ये अधिक कोलेस्टेरॉल सोडते.

त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल झपाट्याने वाढते आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज पाणी पिणे गरजेचे आहे.

आयुष्यात करा फक्त हे बदल, कॅल्शियमच्या कमीसह या समस्या होतील दूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.