एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, होतील अनेक फायदे

Aishwarya Musale

लेमन टी

अनेकांना लेमन टी प्यायला आवडते. केवळ त्याची चवच नाही तर लेमन टीचे फायदेही अतुलनीय आहेत. जर तुम्ही रोज एक कप लेमन टी प्याल तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

विशेषत: आजकाल लोक रोगप्रतिकारक शक्तीसाठी लेमन टीचे सेवन करतात, कारण लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. जे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप महत्वाचे मानले जाते.

लेमन टीमध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण असल्याने, ते वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. लिंबूमध्ये काही नैसर्गिक घटक असतात जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.

याशिवाय, ते तुम्हाला ताजेतवाने ठेवते आणि ते आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. यासोबतच उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी लेमन टी खूप फायदेशीर मानली जाते.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेले लोक दिवसातून एकदा लेमन टीचे सेवन करून रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतात. उच्च रक्तदाबावर लेमन टी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये पोटॅशियम आढळते, त्यामुळे उच्च रक्तदाबामध्ये ते खूप फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारक शक्ती

लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लेमन टीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा गुणधर्म असतो. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना स्वतःपासून दूर ठेवू शकता.

वजन कमी

जे लोक वजन कमी करत आहेत त्यांच्यासाठी लेमन टी पिणे फायदेशीर ठरू शकते. लिंबूमध्ये खूप कमी प्रमाणात कॅलरीज आढळतात. यामुळेच लेमन टीचा वापर वजन कमी करण्यात मदत करू शकतो.

हायड्रेटेड

आपण अनेकदा योग्य प्रमाणात पाणी पित नाही ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी लेमन टी हा उत्तम पर्याय आहे. लेमन टीचे सेवन केल्याने तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने अनेक आजार राहतात दूर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.