सकाळी उठल्या-उठल्या होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको! जाणून घ्या

Aishwarya Musale

डोकेदुखी

जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी आणि जडपणाच्या समस्येचा सामना करत असाल, तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, तुमचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

7-8 तासांच्या झोपेनंतरही जर तुम्हाला सकाळी डोकेदुखी, जडपणा आणि थकवा जाणवत असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.

यामागे अनेक कारणे असू शकतात. सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी आणि जडपणाची कारणे नेमकी कोणती आहेत? हे जाणून घेणार आहोत.

डिहायड्रेशन

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी डोकेदुखी होण्याची अनेक कारणे असू शकतात. हे डिहायड्रेशनमुळे देखील होऊ शकते.

कधीकधी रात्रीच्या वेळी मद्यपान केल्याने डोकेदुखी आणि जडपणा देखील होऊ शकतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यानेही डोकेदुखी होते. तणाव आणि झोपेमुळेही डोके जड राहते. 

जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

खरंतर, या लोकांना सर्कॅडियन रिदम डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नैसर्गिक बॉडी क्लॉकवर मोठा परिणाम होतो.  

पुरेशी झोप न मिळाल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण झोपेवर नियंत्रण ठेवणारा मेंदूचा भाग काही कारणाने बिघडला तर त्याचा तुमच्या झोपेवर खूप वाईट परिणाम होतो. 

डोकेदुखीची कारणे

डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे की, डोक्याभोवती वेदना किंवा तीव्र वेदना होणे. सायनस आणि संसर्गामुळेही डोकेदुखी होऊ शकते. नाक, डोळ्यांवर देखील वेदना  होऊ शकतात. काही लोकांना दुपारी 4 ते 9 च्या दरम्यान डोकेदुखी होऊ शकते. 

एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, होतील अनेक फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.