संतुलित आहारासाठी फायदेशीर आहेत कार्बोहायड्रेट्स, ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे, अतिशय आवश्यक आहे.

Health Care

या दोन्ही गोष्टींची जर योग्य प्रकारे सांगड घातली तर, तुमचे आरोग्य निरोगी राहिल, यात काही शंका नाही. 

Health Care

संतुलित आहार

संतुलित आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा योग्य प्रकारे समावेश असणे हे फार महत्वाचे आहे.

Health Care

कर्बोदके

कर्बोदकांचा (कार्बोहायड्रेट्स) आहारात समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कर्बोदकांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. शिवाय, आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी कर्बोदके अतिशय फायदेशीर आहेत. 

Health Care

केळी

केळी खायला सर्वांनाच आवडते. या केळ्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि पोटॅशिअमचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. आपल्या शरीराला योग्य प्रकारे खनिजे पुरवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Health Care

रताळे

रताळ्याला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. कारण, रताळ्यांमध्ये कर्बोदके आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत म्हणून रताळ्याला ओळखले जाते.

Health Care

ओट्स

ओट्समध्ये विविध प्रकारच्या धान्यांचा समावेश असतो. या धान्यांमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. हे पोषकघटक आपल्या शरीरातील जीवनसत्वांची, खनिजांची, कर्बोदकांची आणि अँटिऑक्सिडंट्सची कमतरता पूर्ण करण्यास मदत करते.

Health Care

कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care Tips | esakal