सकाळ डिजिटल टीम
नाचणीमधील मुबलक कॅल्शियम आणि भाज्यांमधील फायबरमुळे हे मोमोज चविष्ट असण्यासोबतच शरीरासाठी अत्यंत पौष्टिक मानले जातात.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, तेल, मीठ, कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, आले-लसूण, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि काळी मिरी पावडर लागते.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
कोबी आणि गाजर बारीक किसून एकत्र करावे आणि हाताने पिळून त्यातील जास्तीचे पाणी पूर्णपणे काढून टाकावे.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
एका मोठ्या ताटात नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
कढईत तेल गरम करून आले-लसूण परतावे, नंतर कांदा, कोबी, गाजर आणि शिमला मिरची घालून मंद आचेवर ५ ते १० मिनिटे वाफवून घ्यावे.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
भाज्या शिजवताना मीठ, काळी मिरी पावडर, सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि आवडीनुसार इतर सॉस घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
मळलेल्या पिठाचे लहान गोळे करून मध्यम पारी लाटून घ्यावी, त्यात भाज्यांचे सारण भरावे आणि मोमोजचा योग्य आकार द्यावा.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
तेल लावलेल्या चाळणीवर मोमोज ठेवून ते १० मिनिटे वाफेवर शिजवून घ्यावेत; तयार झालेले गरमागरम नाचणी मोमोज सॉससोबत सर्व्ह करावेत.
Nutritious Ragi Momos Recipe
sakal
लसूण कुठल्या राज्यात सगळ्यात जास्त पिकतो? माहीत आहे का 'गार्लिक सिटी'?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Indias Famous Garlic City
sakal