हार्ट अटॅकचा सायलेंट इशारा ओळखा! ‘ही’ सामान्य वाटणारी लक्षणं ठरू शकतात धोकादायक

Varsha Balhe

हार्ट अटॅक

हार्ट अटॅकची लक्षणं नेहमी फक्त छातीत दुखण्यापुरती मर्यादित नसतात. काही वेळा शरीरात दिसणारे सामान्य वाटणारे बदलही दुर्लक्षित करू नयेत. जाणून घ्या हार्ट अटॅकशी संबंधित काही महत्त्वाचे संकेत.

Heart Attack Symptoms

|

esakal

छातीत दुखणे

छातीत दडपण, जडपणा किंवा वेदना जाणवणे हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. विशेषतः वेदना काही मिनिटांपेक्षा जास्त राहिल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Heart Attack Symptoms

|

esakal

श्वास लागणे

कोणताही मोठा शारीरिक श्रम नसतानाही अचानक श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे हे गंभीर संकेत असू शकतात.

Heart Attack Symptoms

|

esakal

झोपमोड

रात्री वारंवार जाग येणे किंवा झोपताना अस्वस्थ वाटणे यामागे अनेक कारणं असू शकतात. मात्र इतर लक्षणांसोबत हा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Heart Attack Symptoms

|

esakal

डोकेदुखी

डोकेदुखीची अनेक कारणं असतात. मात्र अचानक किंवा असामान्य डोकेदुखीसोबत चक्कर, अशक्तपणा किंवा इतर त्रास जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नका.

Heart Attack Symptoms

|

esakal

पोटदुखी

मळमळ, उलटी, अपचन किंवा पोटात अस्वस्थता ही काही वेळा हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळीही जाणवू शकते, विशेषतः इतर लक्षणांसोबत.

Heart Attack Symptoms

|

esakal

त्वचेतील बदल

अचानक थंड घाम येणे किंवा त्वचा फिकट पडणे यासारखे बदल हृदयाशी संबंधित आपत्कालीन स्थितीत दिसू शकतात.

Heart Attack Symptoms

|

esakal

वेदना

खांदा, हात, पाठ, मान किंवा जबड्यात अचानक वेदना जाणवणे हेही हार्ट अटॅकचे संभाव्य संकेत असू शकतात. छातीत अस्वस्थता किंवा श्वास घेण्यास त्रासासोबत अशी लक्षणं दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

Heart Attack Symptoms

|

esakal

मखाना की पॉपकॉर्न? वेट लॉससाठी काय बेस्ट? डॉक्टरांनी सांगितलं फायनल उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makhana vs Popcorn

|

esakal

येथे क्लिक करा