मराठ्यांनी कसा जिंकला लाहोर? पाकमध्ये फडकलेल्या भगव्या झेंड्याची कहाणी

सकाळ वृत्तसेवा

लाहोरचा किल्ला: मराठ्यांचा धगधगता विजय

'अटकेपार भगवा फडकला' ही केवळ एक म्हण नाही, तर मराठ्यांच्या असीम पराक्रमाची ती साक्ष आहे. लाहोरचा किल्ला जिंकण्याचा इतिहास अनेकांना पूर्णपणे माहिती नाही!

Maratha conquest of Lahore | Sakal

१७५७: अब्दालीची दिल्लीवर स्वारी

अहमदशाह अब्दालीने जानेवारी-फेब्रुवारी १७५७ मध्ये दिल्लीवर हल्ला केला. तब्बल २४ कोटी रुपयांची लूट घेऊन तो पळून गेला, पण मराठ्यांनी त्याचा पाठलाग सुरूच ठेवला!

Maratha conquest of Lahore | Sakal

दिल्लीचे रक्षण... मराठ्यांची जबाबदारी

मुघलांचे रक्षण करणे आणि त्या बदल्यात चौथाई (महसूल) गोळा करणे, ही मराठ्यांची जबाबदारी होती. दिल्लीतील मुघल मराठ्यांच्या छत्रछायेखाली सुरक्षित होते.

Maratha conquest of Lahore | Sakal

उत्तरेत राजकीय समीकरणे बदलली

गाजीउद्दीन वकील, सुरजमल जाट, शीख सैन्य – असे अनेक सरदार मराठ्यांच्या सोबत आले. यामुळे मराठे उत्तरेत अधिक बलाढ्य बनले.

Maratha conquest of Lahore | Sakal

सरहिंदची भीषण लढाई

मल्हारराव होळकर, राघोबा दादा आणि सुरजमल यांच्या सैन्याने अब्दालीच्या जंगबाजखानला धूळ चारली. त्याचा एक सेनापती ठार झाला, तर दुसरा जखमी!

Maratha conquest of Lahore | Sakal

अडथळ्यांवर पैशाची मोहीम

आदिनाबेगने मराठ्यांना दर दिवशी १ लाख रुपये आणि मुक्कामासाठी ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. या स्वारीसाठी मराठ्यांना पुरेसा पैसा मिळाला!

Maratha conquest of Lahore | Sakal

लाहोरच्या दिशेने कूच

मराठ्यांनी आता आपले लक्ष्य लाहोरवर केंद्रित केले. अब्दालीचा मुलगा तैमुरशाह आणि जहानखान किल्ल्यात होते.

Maratha conquest of Lahore | Sakal

लढाई न होता किल्ला गमावला

मराठ्यांच्या वेढ्यापूर्वीच तैमुरशाह मौल्यवान सामानासह अटकला पळून गेला. परिणामी, लाहोरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात कोणत्याही लढाईविना आला.

Maratha conquest of Lahore | Sakal

लाहोरवर भगवा फडकला

ही केवळ एक लढाई नव्हती, तर एक स्पष्ट संदेश होता – मराठे आता उत्तर भारतातही अजिंक्य बनले होते!

Maratha conquest of Lahore | Sakal

पाकमध्ये वाढलीय बेघरांची संख्या, जगात दूसरा क्रमांक; भारताची स्थिती काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Homelessness in India | Sakal
येथे क्लिक करा