Payal Naik
आज गोपाळकालाच्या दिवशी सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी हंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जातो.
आजच्या दिवशी मुंबईत देखील खूप मोठ्या प्रमाणावर दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.
मुंबईतील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांमार्फत दहीहंडी फोडण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सोबतच जास्तीत जास्त थर लावणाऱ्याला मोठं बक्षीसही दिलं जातं.
२०२५ मध्ये कोकणनगर आणि जयजवान या पथकांनी विश्वविक्रम करत तब्बल १० थर लावले.
मात्र इतके थर लावण्यासाठी किती जणांची टीम लागते ठाऊक आहे का?
प्रत्येक पथक वेगवेगळं असतं आणि प्रत्येक पथकाची संख्या वेगळी असते. जर पथक छोटं असेल तर त्यात ४० ते ५० माणसं असतात.
सात थर लावणाऱ्या पथकात सर्वसाधारणपणे १५० ते २५० जणांची टीम असते.
मात्र त्यापेक्षा जास्त थर लावणारी पथकं ही मोठ्या टीमची असतात. यात १० थर लावणारी पथकंही असतात.
१० थर लावणाऱ्या पथकांमध्ये तब्बल ५०० ते ६०० जण असतात.
यातील सगळ्यात खाली ६० ते ८० जणांचा बेस तयार केला जातो. त्यात खांद्यावर घेऊन वर चढवणारे वेगळे असतात.
तर वर तब्बल ६० व्यक्ती असतात. शिवाय यातील एखादा गोविंदा पडला किंवा थर घसरले तर त्यांना पकडायला इतर लोक बाजूने गोल करून हात वर करून उभे असतात.
वरच्या सगळ्यात छोट्या गोविंदाला सेफ्टी म्हणून दोरीची मदत असते. जेणेकरून तो वरून घसरला तरी खाली न पडता हवेत तरंगत राहतो.
मात्र इतरांना पकडायला खाली माणसं असणं गरजेची असतात. जय जवान या पथकामध्ये एकूण ५०० जण असल्याची माहिती आहे.
दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी गौतमी पाटील किती मानधन घेते?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.