तुमच्या वजनानुसार किती पाणी प्यावे? सोपा फॉर्म्युला जाणून घ्या

Anushka Tapshalkar

“8 ग्लास पाणी” हा जुना नियम आता बदलला
पूर्वी दिवसाला 8–10 ग्लास पाणी पिण्याचा नियम सांगितला जात होता, पण आधुनिक विज्ञानानुसार प्रत्येकाच्या शरीरानुसार पाण्याची गरज वेगळी असते.

वजनावर आधारित सोपा फॉर्म्युला
तुमचे वजन (किलोमध्ये) ÷ 30 = दिवसाला आवश्यक लिटर पाणी
उदा. 60 किलो ÷ 30 = 2 लिटर पाणी

जास्त वजन असेल तर पाणीही जास्त लागते
90 किलो वजन असलेल्या व्यक्तीला साधारण 3 लिटर किंवा त्याहून अधिक पाणी आवश्यक असते

उन्हाळ्यात गरज आणखी वाढते
40°C पेक्षा जास्त तापमानात किंवा उन्हात काम/प्रवास करताना घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अतिरिक्त हायड्रेशन आवश्यक ठरते.

व्यायाम करत असाल तर अतिरिक्त पाणी प्या
प्रत्येक 30 मिनिटांच्या शारीरिक हालचालीसाठी साधारण 300–350 मिली अतिरिक्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

sakal

कॅफीनमुळे डिहायड्रेशन वाढू शकते
जास्त चहा-कॉफी घेतल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे त्यासोबत पाणी वाढवणे गरजेचे आहे.

sakal

तहान लागेपर्यंत वाट पाहू नका
तहान लागणे म्हणजे शरीर आधीच थोडे डिहायड्रेट झालेले असते. त्यामुळे दिवसभर थोड्या-थोड्या अंतराने पाणी पिणे सर्वात योग्य आहे.

Sakal

जेवणानंतर चालणं की वज्रासन, काय आहे बेस्ट ऑप्शन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आणखी वाचा