शिवरायांनी रायगड कसा जिंकला?

Shubham Banubakode

जावळीतील संघर्षाची पार्श्वभूमी

जावळी परिसरात मोऱ्यांचे वर्चस्व होते. यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन स्थिरावले आणि तेथून शिवाजी महाराजांना त्रास देण्यास सुरुवात केली.

आदिलशाहीची मदत घेण्याचा प्रयत्न

प्रतापराव मोरे विजापूरला पळाला आणि शिवाजी महाराजांविरोधात आदिलशहाची मदत मागू लागला. त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला.

रायगडावरून उपद्रव वाढला

यशवंतराव मोरे रायगडाच्या माथ्यावरून मावळ प्रांतात हल्ले आणि उपद्रव करू लागले. त्यामुळे शिवरायांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले.

शिवरायांची रणनीती ठरली

या त्रासाला उत्तर देण्यासाठी शिवाजी महाराजांनी हैबतराव सिलीमकर याला सैन्यासह पुढे पाठवले आणि मोहीम सुरू केली.

जावळीतून शिवरायांचे प्रयाण

३० मार्च १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जावळीहून मोहीम सुरू केली आणि रायगडाकडे वाटचाल केली.

रायगडाला वेढा

६ एप्रिल रोजी शिवाजी महाराज रायरी (रायगड) येथे पोहोचले आणि किल्ल्याला वेढा घालण्यात आला. जेधे व मावळ देशमुखांनी महत्त्वाची साथ दिली.

मोऱ्यांची माघार

वेढा दीर्घकाळ चालल्यानंतर यशवंतराव मोरे निरुपाय झाला. शेवटी हैबतराव सिलीमकर यांच्या मध्यस्थीने चर्चा सुरू झाली.

रायगड स्वराज्यात दाखल

चर्चेनंतर रायगड स्वराज्यात आला. हैबतरावाच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला वतनदारी आणि मान सन्मान देण्यात आला.

प्रेम, विरह अन् इतिहास! 'या' किल्ल्यात दडलाय अधुऱ्या प्रेमकथेचा रहस्यमय प्रसंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirpur Fort Love Story and History

|

esakal

हेही वाचा -