घरातील 'या' टाकाऊ वस्तूंच्या मदतीने सजवा तुमचे टेरेस गार्डन

Monika Lonkar –Kumbhar

गॅलरी आणि टेरेस

घरासमोरच्या अंगणात विविध प्रकारची झाडे लावण्यासोबतच, आजकाल गॅलरी आणि टेरेसवर देखील बाग-बगीचा फुलवला जात आहे. 

Gardening Tips

त्यामुळे,लोक आता गॅलरी आणि टेरेस सजवण्यावर भर देत आहेत.

Gardening Tips

टेरेसवरील गार्डन सजवणे हे वाटते तितके फार काही अवघड काम नाही. यासाठी तुम्ही घरातीलच काही पडून राहिलेल्या टाकाऊ वस्तूंचा वापर करू शकता. या वस्तूंच्या मदतीने तुम्ही तुमचे टेरेस गार्डन सुंदररित्या सजवू शकता.

Gardening Tips

शोभेच्या वस्तू ठेवा

खर तर आपल्या घरात कितीतरी शोभेच्या वस्तू आणून ठेवलेल्या असतात. यातील काही शोभेच्या वस्तू तशाच पडून राहतात. यातीलच काही घरात पडून राहिलेल्या शोभेच्या वस्तूंचा वापर तुम्ही टेरेस गार्डन सजवण्यासाठी करू शकता. 

Gardening Tips

यामुळे, तुमच्या टेरेस गार्डनला आणखी शोभा येईल. यात काही शंका नाही.

Gardening Tips

दिवाळीतील लाईटिंगच्या माळा

दिवाळीमध्ये आपण घर सजवण्यासाठी लाईटिंगच्या माळांचा वापर करतो. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि विविध आकारांतील लाईटिंगच्या माळा लावून आपण आपले घर सजवतो. मात्र, दिवाळी झाल्यानंतर या माळा काढून ठेवल्या जातात. यातील काही लाईटिंगच्या माळा घरातच नंतर पडून राहतात. या माळांचा वापर करून तुम्ही तुमचे टेरेस गार्डन उत्तम प्रकारे सजवू शकता.

Gardening Tips

टेरेस गार्डनवर लावा झोपाळा

अनेक जण झोपाळा घरातच लावतात. मात्र, तुम्ही टेरेस गार्डनवर ही झोपाळा लावू शकता. या मुळे तुमच्या टेरेस गार्डनला छान लूक येईल आणि झाडांच्या सानिध्यात झोपाळ्यात बसायला तुम्हाला ही छान वाटेल. 

Gardening Tips

वीगन डाएट म्हणजे काय? फॉलो करण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegan Diet