वीगन डाएट म्हणजे काय? फॉलो करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ फायदे

Monika Lonkar –Kumbhar

वर्कआऊट्स

आजकाल अनेक जण फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआऊट्स आणि व्यायाम करतात. 

Vegan Diet

आहार

यासोबतच फिट राहण्यासाठी विविध प्रकारच्या डाएटचा ही आहारात समावेश करतात.

Vegan Diet

वीगन डाएट

वीगन डाएट हा एक आहाराचा एक प्रकार आहे. या डाएटमध्ये प्राणी किंवा त्यांचा वापर करून बनवलेल्या उत्पादनांचा समावेश अजिबात नसतो. मात्र, अनेकांना असे वाटते की, हा शाकाहारी आहाराचा एक प्रकार आहे. परंतु, हे त्यापेक्षा वेगळे आहे.

Vegan Diet

या डाएटमध्ये फक्त आणि फक्त वनस्पतींपासून बनवलेल्या गोष्टींचा समावेश केला जातो. या डाएटमध्ये दूध, लोणी, चीज, मध, अंडी, मांस आणि इतर सर्व दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, हा एक प्लॅंट बेस्ड (वनस्पती आधारित) आहार आहे. ज्यामध्ये केवळ वनस्पतींपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो.

Vegan Diet

हृदयासाठी फायदेशीर

वीगन डाएटमध्ये कॉलेस्ट्रॉलचा अजिबात समावेश आढळून येत नाही. त्यामुळे, आजारांचा धोका कमी होतो. इतकच नव्हे, तर हे वीगन डाएट आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Vegan Diet

रक्तदाब आणि मधुमेहींसाठी लाभदायी

वीगन डाएटमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे मुबलक प्रमाण आढळून येते. त्यामुळे, हा आहार तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. हे डाएट जर तुम्ही फॉलो केले तर तुम्ही रक्तदाब आणि मधुमेह इत्यादी आजारांवर ही नियंत्रण ठेवू शकता.

Vegan Diet

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वीगन डाएट फॉलो केले तर ते तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी करते आणि प्रथिनांच्या सेवनाला प्रोत्साहन देते. ज्यामुळे, वजन कमी होण्यास मदत होते.

Vegan Diet

आरोग्यासाठी लाभदायी आहे ब्राऊन राईस, जाणून घ्या 'हे' फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brown Rice Benefits | esakal