Varsha Balhe
जिरे उगवण्यासाठी वेगळे बी आणण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात असलेले जिरे वापरूनही तुम्ही कुंडीत जिरे उगवण्याचा प्रयत्न करू शकता.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
यासाठी आधी ८ ते १० इंच खोल आणि खालच्या बाजूला छिद्र असलेली कुंडी घ्या. कुंडीत पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
कुंडीत बागेतील माती, कंपोस्ट खत आणि वाळू यांचे मिश्रण भरा. माती भुसभुशीत ठेवा आणि जास्त घट्ट दाबू नका.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
पेरणी करण्यापूर्वी जिरे साधारण ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे जिऱ्याला मोड येण्यास मदत होऊ शकते.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
भिजवलेले जिरे मातीवर थोडे लांब-लांब पसरवून टाका. त्यावर अगदी पातळ माती किंवा कोकोपीटचा थर द्या.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
यानंतर स्प्रे बॉटलने हलकेच पाणी द्या. सुरुवातीला जास्त पाणी देऊ नका, फक्त माती ओलसर राहील याची काळजी घ्या.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
जिऱ्याच्या रोपाला दररोज साधारण ४ ते ५ तास चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा. मातीचा वरचा थर सुकला असेल तरच हलके पाणी द्या.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
साधारण १० ते १५ दिवसांत लहान मोड दिसू शकतात. मात्र, हवामान आणि बियाण्याच्या गुणवत्तेनुसार हा कालावधी बदलू शकतो.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
साधारण ३ ते ४ महिन्यांत रोपाला फुले येऊ शकतात. फुलांनंतर तयार झालेल्या शेंगा तपकिरी झाल्यावर त्या काढून उन्हात वाळवा आणि चोळल्यानंतर घरचे जिरे मिळवता येतात.
HOW TO GROW CUMIN AT HOME IN POT
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
SOYA CHUNKS MAKING PROCESS
esakal