कोथिंबीर 2-3 दिवसांत काळी-पिवळी पडतेय? ‘ही’ सोपी ट्रिक वापरा, अनेक दिवस राहील हिरवीगार

Varsha Balhe

कोथिंबीर काळी-पिवळी पडतेय?

फ्रिजमध्ये ठेवूनही कोथिंबीर काही दिवसांत काळी किंवा पिवळी पडते? यामागे जास्त ओलावा आणि चुकीची साठवणूक कारणीभूत असू शकते. काही सोप्या टिप्स वापरून कोथिंबीर जास्त काळ ताजी ठेवता येते.

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

खराब पानं

कोथिंबीर साठवण्याआधी तिची निवड करा. पिवळी, काळी किंवा सडलेली पानं आणि खराब देठ वेगळे करा. एक खराब पानही बाकीच्या कोथिंबिरीला लवकर खराब करू शकतं.

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

कोथिंबीर ओली ठेवू नका

कोथिंबिरीवर जास्त पाणी राहिल्यास ती लवकर सडू शकते. धुतल्यानंतर ती पूर्णपणे कोरडी होऊ द्या. शक्य असल्यास साठवण्याआधी तिच्यावरचा अतिरिक्त ओलावा काढून टाका.

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

CORIANDER STORAGE TIPSटिश्यू पेपर

कोथिंबीर कोरडी झाल्यानंतर तिला टिश्यू पेपर किंवा स्वच्छ सुती कापडात हलकेच गुंडाळा. यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जाण्यास मदत होते आणि कोथिंबीर जास्त काळ ताजी राहू शकते.

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

हवाबंद

टिश्यूमध्ये गुंडाळलेली कोथिंबीर स्वच्छ डब्यात ठेवून फ्रिजमध्ये साठवता येते. डब्यात जास्त पाणी किंवा ओलावा साचणार नाही याची काळजी घ्या.

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

पद्ध ट्राय करा

कोथिंबिरीचे देठ थोड्या पाण्यात फुलांसारखे उभे करून ती फ्रिजमध्ये ठेवता येते. मात्र, पाणी स्वच्छ ठेवणे आणि वेळोवेळी बदलणे महत्त्वाचे आहे.

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

सोपा फॉर्म्युला

खराब पानं काढा अतिरिक्त ओलावा काढा टिश्यू/कापडात गुंडाळा → डब्यात ठेवा फ्रिजमध्ये साठवाम्हणजेच, कोथिंबीर टिकवण्यासाठी पाणी कमी आणि योग्य साठवणूक जास्त महत्त्वाची!

CORIANDER STORAGE TIPS

|

esakal

घरच्या घरी बनवा ताजं चीज; फक्त 2 पदार्थांत होईल तयार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST HOMEMADE FRESH CHEESE RECIPE

|

esakal

येथे क्लिक करा