Varsha Balhe
गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तर हवाच! पण यंदा नेहमीच्या उकडीच्या मोदकांपेक्षा काहीतरी हटके आणि आकर्षक बनवायचं असेल, तर बीटरूट उकडीचा मोदक नक्की ट्राय करा.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
बीटरूटच्या रसामुळे मोदकांना सुंदर गुलाबी रंग येतो आणि नारळ-गुळाच्या सारणामुळे त्याची चवही अप्रतिम लागते. चला तर मग, जाणून घेऊया हा सुंदर आणि चविष्ट मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
बीटरूटमुळे मोदकांना सुंदर लाल-गुलाबी रंग येतो. त्यामुळे हे मोदक दिसायला आकर्षक तर लागतातच, शिवाय चवीला देखील छान लागतात.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
सारणासाठी ओला नारळ, गूळ, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्या. कढईत तूप गरम करून नारळ आणि गूळ मंद आचेवर परतून घ्या.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
गूळ वितळून सारण थोडं सुके झाल्यावर त्यात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घाला. हे सारण बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेवा.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
आता एका भांड्यात अर्धा कप बीटरूटचा रस आणि अर्धा कप पाणी उकळायला ठेवा. त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घालून उकळी आल्यावर तांदळाचं पीठ घाला.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
पीठ नीट ढवळून गॅस बंद करा आणि ५ मिनिटं झाकून ठेवा. नंतर उकड कोमट असतानाच मऊसर मळून घ्या.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
पिठाची पारी तयार करून त्यात नारळ-गुळाचं सारण भरा आणि मोदकाचा आकार द्या. मोदकपात्रात १० ते १२ मिनिटं उकडून घ्या. तयार झाले तुमचे सुंदर, स्वादिष्ट बीटरूट उकडीचे मोदक.
BEETROOT UKADICHE MODAK RECIPE IN MARATHI
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Betel Leaf Modak Recipe
esakal