झाडांसाठी घरच्या घरी बनवा कीटकनाशक स्प्रे, स्वयंपाकघरातील 'हे' मसाले येतील कामी

Monika Lonkar –Kumbhar

झाडे

झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली की, झाडे छान बहरतात आणि हिरवीगार दिसतात. झाडांची काळजी घेणे म्हणजे झाडांना फक्त पाणी घालणे असे होत नाही.

Gardening Tips

झाडांची काळजी

झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी झाडांना नियमित पाणी घालण्यासोबत, खत देखील घालावे लागते. त्यासोबतच, कीटकनाशकांची फवारणी देखील करावी लागते. जेणेकरून झाडांना कोणतीही कीड लागणार नाही.

Gardening Tips

कीटकनाशके

अनेक जण मार्केटमध्ये मिळणाऱ्या कीटकनाशकांचा वापर करताना दिसतात. मात्र, या कीटकनाशकांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स असतात. त्यामुळे, यांचा वापर जास्त प्रमाणात करणे हे झाडांसाठी धोकादायक ठरू शकते.

Gardening Tips

स्वयंपाकघरातील मसाले

तुम्ही स्वयंपाकघरातील मसाल्यांपासून घरच्या घरी वनस्पतींसाठी कीटकनाशकांचा स्प्रे तयार करू शकता. कोणते आहेत हे मसाले? चला तर मग जाणून घेऊयात.

Gardening Tips

हळद

हळदीला अतिशय औषधी मानले जाते. स्वयंपाकघरासोबतच हळद आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये हळदीचा वापर आवर्जून केला जातो. झाडांसाठी देखील हळद फायदेशीर आहे.

Gardening Tips

हळदीचे पाणी

वनस्पतींना रोगमुक्त करण्यासाठी आणि झाडांच्या चांगल्या वाढीसाठी हळद अतिशय लाभदायी आहे. झाडांजवळची जमिन पुन्हा सुपीक करण्यासाठी तुम्ही खुरपणी करताना हळदीचा वापर करा. त्यासोबतच झाडांवर हळदीचे पाणी कीटकनाशकांप्रमाणे फवारा, यामुळे, झाडांना कीड लागणार नाही

Gardening Tips

हिंग

स्वयंपाकघरात हळदीसोबतच हिंगाचा देखील आवर्जून वापर केला जातो. हिंगामुळे खाद्यपदार्थांना चव येते. आपल्या आरोग्यासोबतच हिंग वनस्पतींसाठी देखील फायदेशीर आहे.

Gardening Tips

हिंगाचे पाणी

वनस्पतीला रोगमुक्त करण्यासाठी आणि कीड लागू नये, यासाठी तुम्ही हिंगाच्या पाण्याचा प्रभावीपणे वापर करू शकता. यासाठी स्प्रे बॉटल घ्या आणि त्यात हिंगाचे पाणी घालून याची फवारणी झाडांवर करा. यामुळे, झाडांचे कीडीपासून संरक्षण होईल.

Gardening Tips

झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gardening Tips | esakal