झाडांची योग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Monika Lonkar –Kumbhar

झाडांची काळजी

झाडांची काळजी घेणे म्हणजे केवळ झाडांना पाणी घालणे असे होत नाही. तुम्ही नियमितपणे झाडांना पाणी घालत असाल आणि तरी देखील झाडे सुकल्यासारखी दिसत असतील तर झाडांना फक्त पाणी गरजेचे नाही. त्यासोबत झाडांना इतर गोष्टींची ही आवश्यकता असू शकते.

Gardening Tips

गार्डनिंग टिप्स

झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली की झाडांची छान वाढ होते आणि झाडे मस्त हिरवीगार होतात

Gardening Tips

सूर्यप्रकाश महत्वाचा

झाडांसाठी सूर्यप्रकाश अतिशय महत्वाचा आहे. शिवाय, झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यावर झाडे छान बहरतात आणि फुलतात.

Gardening Tips

खत महत्वाचे

वनस्पतींच्या योग्य वाढीसाठी खत अतिशय फायदेशीर आहे. थोडक्यात खत हे झाडांसाठी एकप्रकारचे प्रोटीन आहे. त्यामुळे, झाडांना अवश्य खत घाला. शक्यतो विकतचे खत आणू नका, त्याऐवजी कंपोस्ट खताचा वापर करा.

Gardening Tips

झाडांची करा छाटणी

तुमच्या झाडाचा कोणताही भाग हा जर सडलेला किंवा खराब झालेला असेल तर त्या भागाची छाटणी करा. 

Gardening Tips

अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे, संपूर्ण झाड खराब होण्याचा धोका निर्माण होतो. झाडांची छाटणी केल्याने झाडांची योग्य प्रकारे वाढ होण्यास मदत होते.

Gardening Tips

कीटकनाशकांचा करा वापर

अनेकदा झाडांना कीड लागते. कीड लागल्यावर मग झाडांची वाढ खुंटते. झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि त्यांना कीड लागू नये, यासाठी महिन्यातून १ ते २ वेळा झाडांवर कीटकनाशक फवारा. मात्र, जास्त प्रमाणात झाडांवर कीटकनाशकांचा फवारा करणे टाळा.

Gardening Tips

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या 'या' दाक्षिणात्य अभिनेत्री माहित आहेत का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

south actress