ओव्हरथिंकिंग कसं थांबवायचं? ‘या’ ५ गोष्टी करून पाहा!

Varsha Balhe

ओव्हरथिंकिंग कसं थांबवायचं?

आपण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवर खूप जास्त विचार करतो. सुरुवातीला ही रोजची सवय वाटते, पण हळूहळू आपण नकळत ओव्हरथिंकिंग करायला लागतो. ओव्हरथिंकिंगपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी काही छोट्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्यायला हवं.

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

आपले विचार लिहून काढा

मनात सतत येणारे नकारात्मक किंवा त्रासदायक विचार एका कागदावर लिहून काढा. असं केल्याने डोक्यात सुरू असलेला विचारांचा गोंधळ थोडा कमी होण्यास मदत होते.

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

दीर्घ श्वास घ्या

विचार खूप वाढले की शांत बसा आणि हळूहळू दीर्घ श्वास घ्या. काही वेळ फक्त श्वासावर लक्ष दिल्याने मन शांत करण्यास मदत होऊ शकते.

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

वर्तमान क्षणावर लक्ष द्या

ओव्हरथिंकिंगमध्ये आपण एकतर जुन्या गोष्टींचा विचार करत राहतो किंवा पुढे काय होईल याची चिंता करत असतो. त्यामुळे सध्या आपल्या आजूबाजूला काय घडतंय, याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा.

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

विचार

मनात एखादा विचार आला की तो लगेच खरं मानू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, हे खरंच घडतंय की माझी भीती मला असं वाटायला लावतेय?’

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

दोष

एखादी चूक झाली किंवा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करू नका. प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःला देण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल, याचा विचार करा.

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

तज्ज्ञांची मदत घ्या

ओव्हरथिंकिंगमुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत असेल आणि विचार स्वतःहून थांबत नसतील, तर तज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. योग्य मार्गदर्शनामुळे या विचारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.

OVERTHINKING KASA THAMAVAYCHA?

|

esakal

सचिनचा 'नर्व्हस 90' वैभव सूर्यवंशीकडे! बघा कितीवेळा हुकलंय शतक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SOORYAVANSHI NERVOUS 90 RECORD

|

esakal

येथे क्लिक करा