कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तूप आहे फायदेशीर, असा करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

हिवाळा

हिवाळ्यात त्वचेसोबत आपल्याला केसांची ही विशेष काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये त्वचा जशी कोरडी पडते. तसेच, केस देखील कोरडे पडतात आणि कोरड्या केसांमुळे कोंड्याची समस्या निर्माण होते. 

Hair Care Tips

तूप

तूपामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि फॅटी अ‍ॅसिड्स समावेश असतो. त्यामुळे, केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तूप फायदेशीर आहे.

Hair Care Tips

तूपाचा वापर हा केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. हो तुम्ही वाचले ते खरे आहे. तूपामुळे केसांमधील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

Hair Care Tips

तूप आणि कडुलिंबाची पाने

कडुलिंब हे आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या पानांमुळे केसांतील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. यासाठी १०-१२ कडुलिंबाची पाने घ्या. 

Hair Care Tips

ही पाने मऊ होईपर्यंत कोमट पाण्यात उकळून घ्या.आता या पानांची बारीक पेस्ट करून ती तूपात मिसळा. ही पेस्ट आता केसांना लावा. २५-३० मिनिटे झाली की केस धुवून टाका.

Hair Care Tips

गरम तूपाने करा केसांची मालिश

४-५ चमचे तूप घ्या. हे तूप वितळेपर्यंत गरम करा. जास्त ही गरम करू नका. तूप वितळले आणि नॉर्मल गरम झाले की गॅस बंद करा. आता तुमचे केस दोन विभागांमध्ये विभागून घ्या. 

Hair Care Tips

आता १५ ते २० मिनिटे गरम तूपाने बोटांच्या सहाय्याने केसांची मालिश करा. तुमच्या स्काल्पला (टाळूला) मालिश करा आणि ज्या भागात जास्त कोंडा आहे, त्या भागात तूपाने जास्त मालिश करा. त्यानंतर, ३० मिनिटे तूप केसांमध्ये तसेच राहुद्या. त्यानंतर, केस स्वच्छ धुवून घ्या आणि केसांना छान कंडिशनिंग करा.

Hair Care Tips

हिवाळ्यातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे आल्याचे पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care | esakal