'हरमन'सेना जोरात इंग्लंड कोमात; 25 वर्षे जुना विक्रम मोडला

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडविरूद्धचा एकमेव कसोटी सामना 347 धावांनी जिंकला. महिला कसोटी क्रिकेटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.

यापूर्वी 25 वर्षापूर्वी 1998 ला श्रीलंका महिला संघाने पाकिस्तानचा 309 धावांनी पराभव केला होता.

1972 मध्ये डर्बन येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 188 धावांनी पराभव केला होता. हा महिला कसोटी क्रिकेटमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.

1949 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 186 धावांनी पराभव केला होता. हा महिला कसोटी क्रिकेटमधील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.

1949 मध्येच इंग्लंड महिला संघाने न्यूझीलंडचा 185 धावांनी पराभव केला. हा पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma | esakal