संसर्गजन्य आजारावर प्रतिकारशक्तीने करता येते मात

अंकिता खाणे (Ankita Khane)

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात एकीकडे पावसाने कहर केला असला तरी दिवसभर ढगाळी वातावरणामुळे रोगट परिस्थिती उद्भवली आहे.

याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत आहे. हे वातावरण विषाणू आणि बॅक्टेरियाच्या वाढीसाठी पोषक आहे. तर पावसाळ्यात पचनसंस्था तुलनेने कमकुवत होते.

यामुळे मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास होत आहे. मुलांमध्ये व्हायरल इन्फेक्शनसोबतच पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखीसह सर्दी, दमा आजारांचा धोका आहे.

आजाराची लागण झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असल्यास संसर्गजन्य आजाराचा सामना सहज करता येतो.

जुलै महिन्यात पाऊस सुरू होतो. मात्र यंदा पावसाने विदर्भाला बगल देत महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे दमट वातावरण निर्माण झाले आहे.

या मोसमात पाणी दूषित असते. यामुळे डासांचा हैदोस वाढतो आणि डासांच्या डंखानंतर डेंगीपासून तर मलेरियासारखे आजार होण्याची भीती असते.

तसेच या मोसमात हिरव्या पालेभाज्या खायच्या असल्यास स्वच्छ धुवून ख्याव्यात असा सल्ला देतानाच या मोसमात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यसाटी ड्राय फ्रुट खावे, असे निरीक्षण वैद्यक तज्ज्ञांनी नोंदविले.

हवामान बदलाचा ज्येष्ठांना परिणाम

घशाचा संसर्ग, न्यूमोनिया, खोकला, सर्दी

मुलांना होणारा त्रास

पोटदुखी, उलट्या, जुलाबाच्या तक्रारी, गॅस्ट्रो

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

टायफॉईड, मलेरिया, डेंगी, डोळ्यांचे व जठराचे आजार

हे खा..

मनुका, अंजीर, नाशपती, डाळिंब, चेरी, प्लम

सततच्या पावसाअभावी हवेत धुळीचे कण पसरत आहेत. दुसरीकडे, संसर्ग देखील बळावतो. दम्याची तक्रार वाढली आहे. तरुणांमध्येही हा विषाणू पसरत आहे.

मुसळधार पाऊस पडून हवामान सामान्य होईपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. मुलांना पावसात जास्त वेळ खेळू देणे तसेच भिजत राहणे चांगले नाही. असं डॉ.अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ सांगतात.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

milk tea | sakal