सिगारेट पिणाऱ्यांसाठी वाईट बातमी!

Ashok Jawale

किमतीत वाढ

आयटीसीने गोल्ड फ्लेक प्रीमियम सिगारेटच्या १० नगांच्या पाकिटाची किंमत १२५ रुपयांवरून १३५ रुपये केली आहे. यंदा किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे.

नवी किंमत किती?

नव्या दरानुसार एका सिगारेटसाठी १३ रुपये ५० पैसे मोजावे लागणार. म्हणजेच प्रत्येक सिगारेटमागे एक रुपयाची वाढ.

कोणता ब्रँड?

ही दरवाढ गोल्ड फ्लेक प्रीमियमच्या ६० ते ७० मिलिमीटर लांबीच्या रेग्युलर साइज फिल्टर टिप्ड सिगारेटसाठी लागू आहे.

जूनमध्येही दरवाढ

जून २०२६ मध्ये गोल्ड फ्लेक प्रीमियमच्या दहा सिगारेटच्या पाकिटाची किंमत ११५ रुपयांवरून १२५ रुपये करण्यात आली होती.

६ महिन्यांत २० रुपयांची वाढ

जूनपूर्वी ११५ रुपये असलेले पाकीट आता १३५ रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच या कालावधीत पाकिटाच्या किमतीत एकूण २० रुपयांची वाढ झाली आहे.

डिसेंबरपासून दरवाढ

नव्या किमतीची पाकिटे साधारणपणे डिसेंबरपासून किरकोळ बाजारात उपलब्ध होऊ शकतात.

बदलांचा परिणाम

वाढीव कर आणि उत्पादन खर्चाचा दबाव यामुळे किमतीवर परिणाम झाल्याची शक्यता.

खिशाला फटका

गोल्ड फ्लेक प्रीमियमच्या दहा सिगारेटच्या पाकिटासाठी आता १० रुपये अधिक मोजावे लागणार.

अॅलिस हुआंग कोण? NVIDIAच्या CEOमुळे चर्चेत, सध्या काय करते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

alice huang

|

Esakal

येथे क्लिक करा