kimaya narayan
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत तिच्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे.
कंगनाचा इमर्जन्सी हा सिनेमा अखेर 17 जानेवारीला रिलीज होतोय. यानिमित्ताने पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे.
कंगना तिच्या वादग्रस्त विधानांबरोबर चर्चेत राहिली ते तिच्या अफेअर्स मुळे. तिचं नाव अनेक अभिनेत्यांशी जोडलं गेलं पण एकाबरोबरही तिचं नातं टिकलं नाही. यातीलच एक नाव म्हणजे आदित्य पंचोली.
आदित्य आणि कंगनामध्ये तब्बल 20 वर्षांचं अंतर होतं. त्यावेळी कंगना फक्त 17 वर्षांची होती. इतकंच नाही तर ते लिव्ह इनमध्येही असल्याची चर्चा होती.
कंगनाने आदित्य विरोधात मारहाण केल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. अनेक वेळा आदित्यने तिला मारहाण केल्याचा आरोप तिने केला होता. तर तिच्या बहिणीनेही याला दुजोरा देत तिच्याकडून 1 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं होतं.
कंगनाने एका मुलाखतीत असं सांगितलं कि, "मी जेव्हा 17 वर्षांची होते तेव्हा त्याने माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळले आणि कारमध्ये माझ्यावर बलात्कार केला. तो माझे फोटो काढून मला ब्लॅकमेल करायचा." यानंतर आदित्यने पोलीस स्टेशनमध्ये तिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.
एकदा आदित्यने तिला रस्त्यावर ढकललं होतं, त्यामुळे तिला चक्कर आली, तिच्या डोक्याला मार लागला आणि रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानंतर कंगनाने तिची चप्पल उचलली आणि त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.