priyanka kulkarni
बॉलिवूडमध्ये गुनीत मोंगा, मीरा नायर, प्रेरणा अरोरा, अश्विनी अय्यर तिवारी आणि झोया अख्तर यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊयात भारतीय सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या फिल्ममेकर्सबद्दल...
मीरा नायरला यांना परिचयाची गरज नाही या चित्रपट निर्मात्या पहिल्या काही महिला चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत ज्यांनी भारताला जागतिक पातळीवर नेऊन पोहचवलं.
सलाम बॉम्बे!, गोल्डन ग्लोब विजेता हिस्टेरिकल ब्लाइंडनेस, व्हॅनिटी फेअर, द नेमसेक, द रिलकंट फंडामेंटलिस्ट आणि 'द सुटेबल बॉय' हे मीरा नायर यांचे चित्रपट आहेत.
गुनीत मोंगानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.
गेल्या वर्षी गुनीतच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या माहितीपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला.
प्रेरणा अरोरा यांनी सामाजिक समस्यांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली.
'टॉयलेट: एक प्रेम कथा' (2017), 'रुस्तम' (2016), पॅडमॅन (2018) आणि 'परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण (2018) या चित्रपटांची प्रेरणा अरोरानं निर्मिती केली आहे.
अश्विनीच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकली तर तुम्हाला दिसेल की तिचे चित्रपट स्त्रियांच्या आयुष्यावर आधारित आहेत.
कॉमेडी-ड्रामा निल बट्टे सन्नाटा (2016) या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विनीनं केलं.
2009 मध्ये झोयाने 'लक बाय चान्स'मधून पदार्पण केले.‘जिंदगी ना मिलेंगी दोबारा’ या तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.