रोहित कणसे
एखाद्याला कानाखाली मारणे हा भारतात कायदेशीर गुन्हा असून भारतीय कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चापट मारू शकत नाही. ही हिंसा मानली जाते.
आज आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही भारतात एखाद्याला चापट मारल्यास तुमच्यावर काय कारवाई केली जाऊ शकते.
भारतात कोणत्याही व्यक्तीला कानाखाली मारणे हा गुन्हा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
मंडीमधून खासदार निवडून आलेली चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत हिला गुरुवारी चंदीगडमध्ये CISF महिला सुरक्षा कर्मचाऱ्याने थप्पड मारल्याचा आरोप आहे.
शिक्षा किती होईल? याबद्दल सांगायचे झाल्यास अशा प्रकरणांमध्ये पोलीस भारतीय दंड संहिता (IPC) कलम 323 अंतर्गत गुन्हा नोंदवतात.
आयपीसीच्या कलम 323 अंतर्गत, जर एखाद्याने स्वेच्छेने एखाद्याला दुखापत किंवा हानी पोहोचवली, तर असे केल्यास त्याला 1 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात.
घटनेच्या वेळी कोणीतरी गैरवर्तन केले आणि नंतर घटना घडवून आणली हे सिद्ध झाल्यास, न्यायालय शिक्षेत बदल देखील करू शकते.
जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला धमकावण्यासाठी प्रतिकात्मक हल्ला केला अन् त्यामुळे कसलंही नुकसान झालं नसेल तरीही पीडिताला भीती वाटली तरी, असे करणारी व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम ३५८ नुसार दोषी मानली जाईल.
याआधी पोलीस सीआरपीसी कलम १०७/५१ अंतर्गत थप्पड मारण्याच्या आणि ठोसे मारण्याच्या घटनांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करत असत, त्यानुसार समज देऊन सोडून दिलं जात असे.
पण आता पोलीस भादंवि कलम ३२३ आणि ३४१ अंतर्गत गुन्हा दाखल होतो, त्यानं नंतर पोलिस तपास अधिकारी पुरावे गोळा करतात, हे प्रकरण न्यायालयात चालवले जाते आणि दोषी आढळल्यास एक वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
आयुष्यात संघर्ष वाट्याला आलेली अभिनेत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.