शोएबने इमरान खान यांचा चालवला वारसा तर वसिमनेही...

अनिरुद्ध संकपाळ

शोएब मलिकचे तिसरे लग्न

शोएब मलिकने नुकतेच पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत लग्न केलं. हे त्यांच तिसरं लग्न असून त्याने यापूर्वी 2002 मध्ये आएशा सोबत आणि 2010 मध्ये सानिया मिर्झासोबत लग्न केलं होतं.

इमरान खान यांनीही केली हॅट्ट्रिक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे देखील आपल्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत असतात. त्यांनी देखील तीन लग्नं केली होती.

पहिले लग्न हे 1995 मध्ये मार्सेले गोल्डस्मिथ सोबत झाले होते. त्यानंतर इमरान यांनी 2018 मध्ये बुशरा बीबी सोबत तिसरा विवाह केला.

वसिम अक्रमने देखील केले दुसरे लग्न

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमने देखील दोन लग्नं केली आहेत. अक्रमचे पहिले लग्न हे 1995 मध्ये हुमा सोबत झालं होतं.

मात्र 2009 मध्ये त्यांचा कॅन्सरने मृत्यू झाला. यानंतर त्यांनी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या शनिएराशी लग्न केलं.

जहीर अब्बस यांची दुसरी पत्नी भारतीय

पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज जहीर अब्बास यांनी देखील दोन लग्न केलं आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव हे नजमा बोखारी आहे. नजमा यांना तीन मुली झाल्या.

जहीर अब्बास यांनी रिटा लुथरा या भारतीय महिलेसोबत 1988 मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर रिटा यांनी मुस्लिम धर्म स्विकारला आता त्यांचं नाव साईमा अब्बास असं आहे.

कमाईच्या बाबतीत सानिया - शोएबमध्ये कोण वरचढ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.