लिव्हरला सूज का येते? ‘ही’ 3 कारणं असू शकतात धोकादायक!

Varsha Balhe

लिव्हरला सूज का येते?

लिव्हरला सूज येण्याला वैद्यकीय भाषेत हेपॅटोमेगाली म्हणतात. ही स्वतःमध्ये एक वेगळी समस्या नसून इतर आजाराचं लक्षण असू शकते. यामागे फॅटी लिव्हर, अतिमद्यपान आणि हिपॅटायटीस ही महत्त्वाची कारणं आहेत.

Liver Swelling Symptoms

|

esakal

चरबी

फॅटी लिव्हरमध्ये लिव्हरच्या पेशींमध्ये अतिरिक्त चरबी जमा होते. लठ्ठपणा, चुकीचा आहार आणि शरीरातील मेटाबॉलिक समस्या यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. काही प्रकरणांमध्ये यामुळे लिव्हरला सूजही येऊ शकते.

Liver Swelling Symptoms

|

esakal

अतिमद्यपान

अतिमद्यपानामुळे लिव्हरच्या पेशींवर नुकसानकारक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लिव्हरमध्ये दाह निर्माण होऊन सूज आणि इतर गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

Liver Swelling Symptoms

|

esakal

हिपॅटायटीसचा संसर्ग

हिपॅटायटीस बी आणि सी सारख्या विषाणूंच्या संसर्गामुळे लिव्हरमध्ये दाह होऊ शकतो. संसर्ग दीर्घकाळ राहिल्यास लिव्हरच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

Liver Swelling Symptoms

|

esakal

लक्षणं

काही लोकांमध्ये सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. मात्र पोटाच्या उजव्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा दुखणं, थकवा, मळमळ, भूक कमी होणे किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं अशी लक्षणं जाणवू शकतात.

Liver Swelling Symptoms

|

esakal

दुर्लक्ष

लिव्हरला सूज येण्यामागचं कारण शोधणं महत्त्वाचं आहे. कारणानुसार उपचार न केल्यास काही लिव्हरच्या आजारांमध्ये फायब्रोसिस किंवा सिरोसिससारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Liver Swelling Symptoms

|

esakal

सूज

लिव्हर वाढल्याचं किंवा सूज आल्याचं निदान डॉक्टर तपासणी, रक्तचाचण्या आणि गरजेनुसार अल्ट्रासाऊंडसारख्या तपासण्यांद्वारे करतात. पोटदुखी, कावीळ, सतत थकवा किंवा इतर त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Liver Swelling Symptoms

|

esakal

डायबिटीजमध्ये रामबाण ठरेल ‘या’ दाण्यांचं पाणी? सकाळी घेतल्यास ब्लड शुगरवर होतो परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fenugreek Water for Diabetes

|

esakal

येथे क्लिक करा