सकाळ वृत्तसेवा
फक्त १०वी शिक्षण, पण कमाईत IIT-IIMवाल्यांनाही मागे टाकलं, हरदाचे मधुसूदन धाकड़ यांनी शेती क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
ते एक पारंपरिक शेतकरी कुटुंबातून येतात. वडिलांसोबत लहानपणापासूनच शेती शिकली. आज ते स्वतः २०० एकरवर शेती करतात.
शेतीत यश मिळवायचं असेल तर बदल स्वीकारा – हे लक्षात येताच त्यांनी बागायती शेतीकडे लक्ष केंद्रित केलं.
त्यांच्या २०० एकरपैकी १३० एकरमध्ये मिर्ची, शिमला मिर्ची, टमाटर, लसूण, आले यासारख्या पिकांची लागवड.
४० एकर मिर्चीवर खर्च ७०,००० रु. प्रति एकर, पण उत्पन्न ३ लाख रुपये प्रति एकर!
२५ एकर शिमला मिर्चीवर ६ लाख रुपये प्रति एकरची कमाई. दर्जेदार उत्पादनामुळे मागणी वाढली.
५० एकरमध्ये टमाटर. एका वर्षात ८ कोटींची विक्री! माजी कृषिमंत्री कमल पटेल यांनी घेतली विशेष मुलाखत.
१५ एकर लसूण लावला त्यावर ७ लाख आणि आल्यावर प्रति एकर २ लाखांचा फायदा – नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा उपयोग.
मधुसूदन यांनी स्वतःची नर्सरी उभारली. इथे २० लाखांहून अधिक रोपटी तयार होतात – हीच त्यांची आत्मनिर्भरतेची गुरुकिल्ली.
त्यांच्या उत्पादनाची मागणी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पंजाबसारख्या राज्यांमध्येही आहे – थेट व्यापार्यांशी व्यवहार.
बाजारपेठेचा अभ्यास, थेट डीलरशी संपर्क – मधुसूदन यांनी शेतीमध्ये व्यवसायिक दृष्टिकोन आणला.
मधुसूदन धाकड़ यांचं यश सांगतं – शिक्षण कितीही असो, जर चिकाटी, बुद्धी आणि मेहनत असेल तर यश नक्कीच मिळतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.