बाळकृष्ण मधाळे
मुंबई : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमेरिकन कंपनी टेस्लाची पहिली मॉडेल वाय कार खरेदी करून इतिहास रचला आहे.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
देशातील टेस्ला वाय कारचे हे पहिलेच मालक ठरले आहेत. खास बाब म्हणजे, ही आलिशान ई-कार त्यांनी आपल्या नातवाला भेट म्हणून दिली आहे.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
सरनाईक म्हणाले की, हा निर्णय केवळ कुटुंबासाठी आनंदाचा क्षण ठरावा म्हणूनच नव्हे तर समाजात पर्यावरणपूरक वाहनांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानेही घेतला आहे.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
या विशेष प्रसंगी मंत्री सरनाईक म्हणाले, “मी स्वतःला भाग्यवान समजतो की भारतातील पहिली टेस्ला कार माझ्या नावावर आहे.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्न करत आहे की, राज्यातील रस्त्यांवर अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने धावावीत.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
येत्या दहा वर्षांत आमचे ध्येय आहे की, महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरात अग्रेसर राज्य ठरावे.”
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
सरनाईक यांनी सांगितले की, ई-वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना परिवहन विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जात आहे.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
त्याचबरोबर, अशा वाहनांच्या मालकांना देखील विशेष फायदे व सुविधा मिळतील.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
त्यांनी पुढे म्हटले, “ई-वाहनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि भावी पिढ्यांना स्वच्छ, निरोगी वातावरण मिळेल.”
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
आपल्या नातवाला टेस्ला भेट देण्यामागील कारण स्पष्ट करताना सरनाईक म्हणाले, “जर सक्षम पालक आपल्या मुलांना शाळेत इलेक्ट्रिक वाहनांमधून घेऊन जातील, तर मुले आपसात या विषयावर चर्चा करतील.
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
याचा समाजावर मोठा परिणाम होईल आणि लोक पर्यावरणपूरक वाहनांकडे अधिक आकर्षित होतील. मुलांच्या माध्यमातून आपण भविष्याचा संदेश पसरवायला हवा की भविष्य इलेक्ट्रिक वाहनांचेच आहे.”
Tesla Model Y India Pratap SarnaiK
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.