सकाळ डिजिटल टीम
IPL 2026 च्या लिलावात आरसीबीने २३ वर्षीय मंगेश यादवला ₹५.२ कोटींना खरेदी करून सर्वांना चकित केले. एका रात्रीत एका ट्रक ड्रायव्हरच्या मुलाचे नशीब पालटले.
Mangesh Yadav
esakal
मध्य प्रदेशातील छिंदवाडा (बोरगाव) येथील रहिवासी. मंगेश एक भेदक डावखुरा वेगवान गोलंदाज आहे, ज्याचा वेग फलंदाजांच्या दांड्या गुल करतो.
Mangesh Yadav
esakal
वडील राम अवध यादव एक साधे ट्रक ड्रायव्हर. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पहाटे ३ वाजता उठून जीव धोक्यात घालून रस्ते तुडवले आणि अपमान सोसले.
Mangesh Yadav
esakal
एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहून मंगेशने क्रिकेटचे धडे गिरवले. पोटाला चिमटा घेऊन आणि कर्ज काढून वडिलांनी मंगेशच्या हातात चेंडू कायम ठेवला.
Mangesh Yadav
esakal
सुरुवातीला खर्च भागवण्यासाठी मंगेश टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा. प्रशिक्षक फूलचंद शर्मा यांनी त्याचे टॅलेंट ओळखून त्याला विनामूल्य प्रशिक्षण आणि राहण्याची सोय करून दिली.
Mangesh Yadav
esakal
यश दयालच्या जागी आरसीबीने मंगेशवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्याची 'स्विंग' आणि 'अचूकता' हीच आरसीबीसाठी जमेची बाजू ठरणार आहे.
Mangesh Yadav
esakal
"परिस्थिती आडवी येते, पण जिद्द असेल तर शून्यातून विश्व निर्माण करता येते," हे मंगेश यादवने जगाला दाखवून दिले.
Mangesh Yadav
esakal
MS Dhoni ची माघार अन् CSK च्या इतिहासात कधी न घडणारी घटना घडली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
MS Dhoni
esakal