कोण होते मराठा साम्राज्याचे अखेरचे सेनापती?

Shubham Banubakode

जन्म

रत्नागिरीजवळच्या तळेखाजण येथे नरहर गणेश गोखले यांचा जन्म झाला. पुढे हाच तरुण मराठ्यांच्या इतिहासात नरवीर बापू गोखले म्हणून ओळखला गेला.

Who was Bapu Gokhale

|

esakal

कर्नाटक मोहीम

अवघ्या चौदा-पंधरा वर्षांच्या वयात बापू गोखले मराठ्यांच्या सैन्यात दाखल झाले. कर्नाटकातील मोहिमांनी त्यांच्या पराक्रमाला खरी दिशा मिळाली.

Who was Bapu Gokhale

|

esakal

घोडेस्वारी

बापूंचं आयुष्य साधं होतं. घोडेस्वारी, बोथाटी आणि कसरत यांच्यात त्यांचा वेळ जायचा. दिखावा, नाचगाणी त्यांना अजिबात पसंत नव्हती.

Who was Bapu Gokhale

|

esakal

आव्हानांचा सामना

मराठा साम्राज्यात उठलेल्या अनेक बंडांना बापूंनी आळा घातला. धोंडाजी वाघापासून ताई तेलीणपर्यंत अनेक आव्हानांचा त्यांनी धैर्याने सामना केला.

Who was Bapu Gokhale

|

esakal

किल्ला राखला

ताई तेलीणने वासोटा किल्ला ताब्यात घेतला होता. बापूंनी तब्बल काही महिने वेढा देत शेवटी हा मजबूत किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

Who was Bapu Gokhale

|

esakal

सेनापती

दुसरे बाजीराव पेशवे बापूंच्या निष्ठेने आणि पराक्रमाने प्रभावित झाले. १८१२ मध्ये त्यांना मोठा सरंजाम देऊन सेनापतीपदाची जबाबदारी सोपवली.

Who was Bapu Gokhale

|

esakal

मराठ्यांची साथ

इंग्रजांनी बापूंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मराठ्यांची साथ सोडण्यापेक्षा प्राण गमावणे पसंत केलं.

Who was Bapu Gokhale

|

esakal

खडकीचं युद्ध

१८१७ च्या खडकीच्या लढाईत बापूंनी इंग्रजांवर जोरदार हल्ला केला. मात्र पेशव्यांच्या निर्णयामुळे त्यांना अखेर रणांगणातून माघार घ्यावी लागली.

Who was Bapu Gokhale

|

esakal

धारातीर्थी

२० फेब्रुवारी १८१८ रोजी गोपाळाची आष्टी येथे बापूंनी मोजक्या स्वारांसह इंग्रजांवर तुटून हल्ला केला. लढता लढताच ते धारातीर्थी पडले.

Who was Bapu Gokhale

|

esakal

स्वामीनिष्ठेचा शेवट

बापूंचा मृत्यू म्हणजे फक्त एका सेनापतीचा अंत नव्हता. मराठ्यांच्या स्वामीनिष्ठेची आणि शेवटपर्यंत लढण्याची ती जिवंत निशाणी होती.

Who was Bapu Gokhale

|

esakal

जग जिंकणारा चंगेज खान भारतात का घुसू शकला नाही?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Genghis Khan Could Not Invade India

|

esakal

हेही वाचा -