Sandip Kapde
मराठ्यांनी दिल्ली काबीज करण्यासाठी भाऊसाहेबांनी मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे आणि बळवंतराव मेहेंदळे यांच्यासह आठ हजार फौज पुढे धाडली.
Marathas blast at Red Fort
esakal
दिल्ली शहर आणि किल्ला अब्दालीने त्याच्या वझीर शहावलीखानाच्या भावाच्या देखरेखीत ठेवला होता.
Marathas blast at Red Fort
esakal
किल्ल्यात दुराणी व पठाण मिळून सुमारे एक हजाराच्या आसपास सैन्य तैनात करण्यात आले होते.
Marathas blast at Red Fort
esakal
मराठी फौजेने सुरुवातीलाच दिल्ली शहरावर ताबा मिळवला.
Marathas blast at Red Fort
esakal
पहिल्यांदा किल्ल्यात घुसलेल्या काही मराठ्यांनी लुटीत गुंतल्यामुळे किल्लेदाराने त्यांना पुन्हा बाहेर हुसकावून दिले.
Marathas blast at Red Fort
esakal
यानंतर मराठ्यांनी थेट लाल किल्ल्यावर मोर्चे लावून वेढा दिला.
Marathas blast at Red Fort
esakal
गारदी इब्राहिमखानाने २-३ तोफांचा दणकुन मारा केल्यावर एक एक बळकट बुरुज धडाधड कोसळायला लागले. तेव्हा मराठ्यांनी मोर्चे कायम करून तोफांचा भडीमार सुरू ठेवला
Marathas blast at Red Fort
esakal
तोफांच्या माऱ्यात दिवाणी-इ-खास, रंगमहाल, मोतीमहाल आणि शहाबुरुज या इमारतींना मोठी चिर पडली.
Marathas blast at Red Fort
esakal
किल्ल्यातील अब्दालीचे सैनिक भीतीने कौल मागू लागले.
Marathas blast at Red Fort
esakal
२९ जुलै १७६० रोजी भाऊसाहेब आणि विश्वासराव स्वतः दिल्लीपाशी येऊन पोचले.
Marathas blast at Red Fort
esakal
अब्दालीने यमुनेच्या पलीकडून हे सर्व पाहिले तरी त्याला मदत करता येत नव्हती.
Marathas blast at Red Fort
esakal
गाजीउद्दिनखानाच्या पुढाकाराने दुराण्यांनी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला.
Marathas blast at Red Fort
esakal
२ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांचा भगवा जरीपटका दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकू लागला.
Marathas blast at Red Fort
esakal
किल्ला जिंकल्यानंतर मराठ्यांनी याकूबअली आणि इतर कुटुंबांना यमुनेतून सुरक्षित बाहेर जाऊ दिले.
Marathas blast at Red Fort
esakal
नंतर भाऊसाहेबांनी नारोशंकर दाणी यांची दिल्लीच्या सुभेदार म्हणून नियुक्ती केली.
Marathas blast at Red Fort
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.